चमच्याने खोदला भुयारी मार्ग अन् तुरूंगातून फरार झाले खतरनाक कैदी, कुणाला कानोकान नाही खबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:01 PM2021-09-07T12:01:11+5:302021-09-07T12:01:51+5:30

इथे सहा खतरनाक कैदी भुयारी मार्ग खोदून अती सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तुरूंगातून फरार झाले. आता या घटनेवरून इस्त्राइलच्या अधिकाऱ्यांची तुलना होत आहेत.

Jail break six Palestinian prisoners escape Israeli jail through tunnel | चमच्याने खोदला भुयारी मार्ग अन् तुरूंगातून फरार झाले खतरनाक कैदी, कुणाला कानोकान नाही खबर

चमच्याने खोदला भुयारी मार्ग अन् तुरूंगातून फरार झाले खतरनाक कैदी, कुणाला कानोकान नाही खबर

googlenewsNext

बॉलिवूडपासून ते हॉलिवडूपर्यंत तुरूंगातून पळून जाण्याच्या घटनांवर अनेक सिनेमे तुम्ही पाहिले असतील. जास्तीत जास्त सिनेमात तुरूंगात बंद असलेला हिरो प्लॅन करून तुरूंगातून पळून जातो. इस्त्राइलमध्येही असाच काही नजारा बघायला मिळाला. इथे सहा खतरनाक कैदी भुयारी मार्ग खोदून अती सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तुरूंगातून फरार झाले. आता या घटनेवरून इस्त्राइलच्या अधिकाऱ्यांची तुलना होत आहेत.

कैदी अजूनही फरार

इस्त्राइलच्या तुरूंगा कैद सहा पॅलेस्टाइन कैद्यांनी पूर्णपणे फिल्मी स्टाइलने हा कारनामा केला. ते अनेक दिवस भुयारी मार्ग खोदत राहिले आणि कुणाला कानोकान खबर लागली नाही. इस्त्राइलने कैद्यांना पकडण्यासाठी देशातील काही भागांमध्ये शोध मोहिम सुरू केली आहे. पोलीस अधिकारी म्हणाले की, कैदी जवळपासच लपले आहेत आणि लवकरच त्यांना पकडलं जाईल.

कसा बनवला भुयारी मार्ग

ही घटना उत्तर इस्त्राइलमधील गिलबो तुरूंगात घडली. पोलिसांनी सांगितलं की, तुरूंगातून पळालेले सगळेच कैदी एकाच सेलमध्ये कैद होते. यातील पाच इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित आहेत आणि एक दहशतवादी संघटनेचा कमांडर राहिला आहे. हाय सिक्युरिटी तुरूंगातून पळण्यासाठी कैद्यांनी बाथरूम सिंकच्या खाली एक भुयारी मार्ग खोदला. ते गंजलेल्या चमच्याने अनेक दिवस भुयारीमार्ग खोदत होते. ते आळी-पाळीने भुयारी मार्ग खोदत होते. मग सामान्य कैद्यांप्रमाणे व्यवहार करत होते. त्यांनी इतक्या शिताफीने आणि शांततेत हे काम केलं की, कुणाला खबरही लागली नाही.

४०० कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी केलं शिफ्ट

कैद्यांनी बाथरूमच्या बाहेरपर्यंत एक भुयारी मार्ग खोदला आणि सोमवारी तेथून फरार झाले. पोलिसांनी सांगितलं की, कैद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ते जवळच्या इस्त्राइलचा ताबा असलेल्या वेस्ट बॅंक भागात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत आणि त्यांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच ४०० कैद्यांना दुसऱ्या स्थानी शिफ्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Jail break six Palestinian prisoners escape Israeli jail through tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.