जैन आध्यात्मिक गुरू लोकेश मुनींचा अमेरिकेत गाैरव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 06:26 AM2024-04-11T06:26:01+5:302024-04-11T06:26:33+5:30
अमेरिकेत सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्कार
वॉशिंग्टन : सार्वजनिक हितासाठी आणि मानवतेसाठी योगदान दिल्याबद्दल भारताचे जैन आध्यात्मिक गुरू लोकेश मुनी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अहिंसा विश्व भारती आणि भारतातील जागतिक शांतता केंद्राचे संस्थापक लोकेश मुनी यांना मंगळवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये ज्येष्ठ लोकशाहीवादी काँग्रेस सदस्य ब्रॅड शर्मन यांच्या हस्ते राष्ट्राध्यक्ष पुरस्कार, गोल्डन शिल्ड आणि सन्मान प्रमाणपत्र मिळाले. “या मानवतेच्या सेवेसाठी तुमचे अभिनंदन करतो,” असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वाक्षरी केलेले उद्धरण या कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आले. हा पुरस्कार जैन धर्मांच्या तत्त्वांचा, त्याचे संस्थापक भगवान महावीर आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचा सन्मान आहे, अशी भावना लोकेश मुनी यांनी व्यक्त केली.