सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:54 AM2019-03-07T11:54:00+5:302019-03-07T11:54:50+5:30

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे.

Jaish used to bomb blast in India when I was in power; Musharraf's Statement | सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मदबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी सरकारच्या सांगण्यावरूनच मसूद अझहर याने भारतात बाँबस्फोट घडवून आणले होते असा गौप्यस्फोट केल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. 


पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 


मुशर्रफ म्हणाले की, मी आधीपासूनच जैशला दहशतवाद्यांची संघटना म्हणत होतो. त्यांनी माझ्यावर दहशतवादी हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार या संघटनेविरोधात कारवाई करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे म्हचले आहे. ही कारवाई याआधीच व्हायला हवी होती. डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानचमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ते बालंबाल बचावले होते. तेव्हा त्यांनी जैशवर बंदी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. 
यावर मुशर्रफ यांनी तेव्हा काळ वेगळा होता. यामध्ये आमच्या आयएसआयचा हात होता. तेव्हा भारतासोबत जशास-तसेची भुमिका राबविली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवायचे म्हणून आम्ही भारतात स्फोट करायचो, असेही सांगितले. 

 

गच्छंतीनंतर मुशर्रफ यांचे पाकिस्तानबाहेर पलायन
मुशर्रफ यांनी लष्करशाहीचा वापर करत 1999 मध्ये पाकिस्तानचा ताबा मिळविला होता. तेव्हा नवाझ शरीफ यांना हटविण्यात आले होते व राष्ट्रपती बनले होते. मात्र, त्यांना नऊ वर्षांनी सत्ता गमवावी लागली होती. यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकला अखेर हे पाऊल उचलावे लागले.


यासंदर्भात पाकचे गृहमंत्री शहरयार खान आफ्रिदी म्हणाले की, दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकचे गृह सचिव आझम सुलेमान खान म्हणाले, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या ज्या दहशतवाद्यांची नावे भारताने गेल्या आठवड्यात कळविली होती त्यात हम्माद व रौफ यांचीही नावे होती. भारताने ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला होता, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली असा अर्थ कोणीही काढू नये. त्या व्यतिरिक्तही अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: Jaish used to bomb blast in India when I was in power; Musharraf's Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.