जमात उद दावा, हक्कानी नेटवर्कवर पाकमध्ये बंदी ?

By Admin | Published: January 15, 2015 01:40 PM2015-01-15T13:40:16+5:302015-01-15T14:22:10+5:30

भारत आणि अमेरिकेकडून वाढत्या दबावानंतर पाकिस्तानने अखेर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्क या संघटनांवर बंदी घालण्याची तयारी सुरु केली आहे.

Jamaat ud-Dawa, ban on Haqqani network in Pakistan? | जमात उद दावा, हक्कानी नेटवर्कवर पाकमध्ये बंदी ?

जमात उद दावा, हक्कानी नेटवर्कवर पाकमध्ये बंदी ?

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १५ - भारत आणि अमेरिकेकडून वाढत्या दबावानंतर पाकिस्तानने अखेर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाक सरकार याची अधिकृत घोषणा करेल असे सूत्रांनी सांगितले. 
मुंबई हल्ला झाल्यापासून भारताने हाफीज सईदच्या नेतृत्वाखाली काम करणा-या जमात उद दावा या संघटनेवर बंदी घालण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाक दौ-यात अमेरिका व भारताला धमकावणा-या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करा असे खडेबोल पाकला सुनावला होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवरुन वाढता दबाव आणि पेशावर हल्ला यानंतर पाक सरकारने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. यामध्ये जमात उद दावा, हक्कानी नेटवर्कसह १० दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये याची अधिकृत घोषणा होईल असे पाकमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे. 
२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रानेही जमात उद दावाला लष्कर ए तोयबाचा मुखवटा असल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेनेही या संघटनेतील अनेक नेत्यांवर बंदी टाकली आहे. याशिवाय २००८ मध्ये जलालुद्दीन हक्कानी यांनी स्थापन केलेली हक्कानी नेटवर्क ही संघटनाही दहशतवादी कृत्यामुळे चर्चेत आली होती. २००८ मध्ये काबूल येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्कचा हात होता. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकेचे दुतावासावरील हल्ला आणि अफगाणमधील बाँबस्फोटांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचेसमोर आले होते. २०१२ मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर बंदी टाकली होती. 

Web Title: Jamaat ud-Dawa, ban on Haqqani network in Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.