जमात-उद-दावावर पाकमध्ये बंदी नाही
By admin | Published: August 26, 2015 03:57 AM2015-08-26T03:57:51+5:302015-08-26T03:57:51+5:30
पाकिस्तानात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची ‘जमात उद दावा’ व अफगाणिस्तानातील अत्यंत धोकादायक समजली
इस्लामाबाद : पाकिस्तानात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची ‘जमात उद दावा’ व अफगाणिस्तानातील अत्यंत धोकादायक समजली जाणारी हक्कानी नेटवर्क या संघटनांवर बंदी नाही.
बंदी घातलेल्या ६० संघटनांच्या यादीत या दोन्ही संघटनांची नावे नाहीत. तथापि, सरकारने अधिकारी बारकाईने लक्ष ठेवणार असलेल्या संघटनांच्या यादीत जमात-उद-दावाचा समावेश केला आहे. याचाच अर्थ असा की, ही संघटना दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचे आढळून आल्यास तिच्यावर बंदी घातली जाऊ शकते.
संयुक्त राष्ट्रसंघाने जमात उद दावावर बंदी घातली असून संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याच्या शिरावर तब्बल १०० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे; मात्र हाफीज पाकमध्ये कोठेही मुक्तपणे फिरतो, तसेच जाहीर सभाही घेतो. (वृत्तसंस्था)