शांतताप्रिय देश जपान आता हाती घेणार शस्त्रे; ड्रॅगनच्या मुकाबल्यासाठी करणार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:13 AM2022-12-18T06:13:00+5:302022-12-18T06:13:09+5:30

जपानचे पंतप्रधान फुमियाे किशिदा यांनी नवी राष्ट्रीय सुरक्षा याेजना जाहीर केली. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी एकूण जीडीपीच्या २ टक्के खर्च करण्यात येणार आहे.

Japan, a peaceful country, will now take up arms; Preparing for the dragon fight | शांतताप्रिय देश जपान आता हाती घेणार शस्त्रे; ड्रॅगनच्या मुकाबल्यासाठी करणार तयारी

शांतताप्रिय देश जपान आता हाती घेणार शस्त्रे; ड्रॅगनच्या मुकाबल्यासाठी करणार तयारी

Next

टाेकियाे : दुसऱ्या महायुद्धात पाेळल्यानंतर शांततेच्या मार्गावर गेलेला जपान लष्करी सामर्थ्य वाढविणार आहे. तेथील सरकारने तब्बल ३५ हजार काेटी डाॅलर्स रकमेची शस्त्रास्त्रखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे सर्वात माेठे कारण आहे चीन आणि उत्तर काेरियाचा वाढता धाेका.

जपानचे पंतप्रधान फुमियाे किशिदा यांनी नवी राष्ट्रीय सुरक्षा याेजना जाहीर केली. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी एकूण जीडीपीच्या २ टक्के खर्च करण्यात येणार आहे. हा आकडा दुपटीने वाढविला आहे. किशिदा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात यामागील भूमिका मांडताना सांगितले, की आजूबाजूचे वातावरण अस्थिर हाेत आहे. त्यामुळे आणीबाणी आणि विशिष्ठ परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशावर थेट हल्ला करण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे. (वृत्तसंस्था) 

काय आहे ड्रॅगनची चाल?
तैवानवर हल्ला केल्यानंतर चीन जपानला हाेणारा सेमिकंडक्टरचा पुरवठा राेखू शकताे. तसे झाल्यास जपानवर फार माेठे संकट येऊ शकते. तसेच चीन जपानचा इंधनपुरवठाही राेखू शकताे. 
जपानकडे नाही सैन्य
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने शांततेचा मार्ग स्वीकारून राज्यघटनेतून सैन्याची अधिकृत मान्यता रद्द केली. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. 

Web Title: Japan, a peaceful country, will now take up arms; Preparing for the dragon fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान