Shocking! ट्रेनमध्ये बॅटमॅनमधील जोकर बनून घुसला; १७ लोकांवर चाकूने हल्ला मग लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 02:21 PM2021-11-01T14:21:30+5:302021-11-01T14:25:45+5:30
Tokyo Train Car Attack: हल्लेखोर 'बॅटमॅन' सिनेमातील जोकरसारखे कपडे घालून होता. एका व्हिडीओ समोर आला असून लोक खिडकीतून उडी घेत जीव वाचवताना बघू शकता.
जपानची (Japan) राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) एका व्यक्तीने ट्रेनमधील प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची (Tokyo Train Car Attack) धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याने ट्रेनच्या डब्यात आगही लावली. या घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत. हल्लेखोर 'बॅटमॅन' सिनेमातील जोकरसारखे कपडे घालून होता. एका व्हिडीओ समोर आला असून लोक खिडकीतून उडी घेत जीव वाचवताना बघू शकता.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, रविवारी ट्रेनमध्ये एका व्यक्तीने अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने ज्वलनशील पदार्थ टाकून ट्रेनमध्ये आग लावण्याचाही प्रयत्न केला. यात हल्ल्यात कमीत कमी १७ लोक जखमी झाले आहेत. यातील तिघांची स्थिती गंभीर आहे.
हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याचं वय २४ च्या आसपास आहे. जिथे ही घटना घडली ते व्यस्त ट्रेन स्टेशन आहे. रिपोर्टनुसार, सगळे लोक हॅलोवीन फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. तेव्हाच जगातील सर्वात व्यक्ती ट्रेन स्टेशन शिंजुकुसाठी जाणाऱ्या कीओ एक्सप्रेस लाइनवर कोकुर्यो स्टेशनवर हा हल्ला झाला.
#BREAKING
— Aamaj News (@aamajnews24) October 31, 2021
At least 15 people injured after an alleged arson attack on the Tokyo metro.
One suspect has been arrested, said to be wielding a knife. Preliminary reports suggest the man poured hydrochloric acid in a carriage and set fire to it.#aamajnews#Japanpic.twitter.com/ERTqPMZO8f
अधिकाऱ्यांनी सांगितलं की यात १७ लोक जखमी झाले आहेत, ज्यात तिघांची स्थिती गंभीर आहे. बॅटमॅनमधील जोकरसारखे कपडे घालून एकाने लोकांवर ट्रेनमध्ये चाकूने हल्ला केला. हल्लेखोराला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हल्लेखोर म्हणाला की, त्याने असं केलं जेणेकरून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी.