जपानला वादळाचा तडाखा, 10 हजार लोक विस्थापित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 04:39 PM2016-08-22T16:39:41+5:302016-08-22T16:39:41+5:30
जपानला माइंडल व लायनरॉक या चक्रीवादळांनी झोडपले असून गेल्या दोन दिवसांमध्ये जपानला बसलेला हा वादळाचा तिसरा तडाखा आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
टोकयो, दि. 22 - जपानला माइंडल व लायनरॉक या चक्रीवादळांनी झोडपले असून गेल्या दोन दिवसांमध्ये जपानला बसलेला हा वादळाचा तिसरा तडाखा आहे. एक जण आत्तापर्यंत दगावला असून जवळपास 10 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. जपानच्या राजधानीत टोकयोमध्ये जवळपास 110 मैल किंवा 180 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असून शेकडोंच्या संख्येने विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
वादळ कमी पडलं म्हणून की काय अनेक भागांमध्ये पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.
सोमवारी सकाळी विमानांची 380 उड्डाणे व 105 एक्स्प्रेस ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
टोकयोस योकोहामा व सेंदाई या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये वादळाचा जास्त फटका बसला आहे. रविवारी कोम्पासू या वादळाने होकैदो या बेटाला धडक दिल्यानंतर 24 तासांच्या आत दोन वादळांनी या चिमुकल्या देशाला झोडपले आहे.
गुरुवारी हे वादळ जपानमधून काढता पाय घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.