Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:40 IST2022-07-08T14:34:54+5:302022-07-08T14:40:35+5:30
Japan Ex PM Shinzo Abe Death : उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचे शुक्रवारी निधन झाले. अबे यांच्यावर आज सकाळीच गोळीबार झाला होता. शिंजो हे नारा शहरात भाषण देत असताना हा गोळीबार झाला. हल्लेखोराने त्याच्यावर मागून दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर शिंजो अबे जमिनीवर पडले आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहत असल्याचे दिसले. या घटनेमुळे जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली असून अबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
माजी पंतप्रधान शिंजो अबे जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात संबोधित करत असताना अचानक जागीच कोसळले होते. प्राथमिक माहितीनुसार शिंजो अबे भाषण करत असताना गोळीबार झाल्यानंतर जखमी होऊन खाली कोसळले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं म्हटलं आहे. तसंच शिंजो अबे खाली कोसळल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्याचंही दिसून आलं असंही स्थानिक पत्रकारानं म्हटलं आहे. शिंजो अबे भाषण करत असताना त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.