जपानने लागू केली आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:42 PM2020-04-18T20:42:58+5:302020-04-18T20:43:16+5:30

जपानमध्येही कोरोनाचा फैलाव होत असला, तरी तिथलं प्रमाण जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे, याचंही एक प्रमुख कारण म्हणजे जपानी लोकांची शिस्त आणि प्रसंगानुरुप वागण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच जपानमध्ये आजही सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं नाही. त्याऐवजी तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Japan imposed Emergency due to corona | जपानने लागू केली आणीबाणी!

जपानने लागू केली आणीबाणी!

Next
ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण जगात ज्या पद्धतीनं ‘उपचार’ करावे लागले, लॉकडाऊन करावं लागलं, तसे कठोर उपाय जपानला करावे लागले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क
जपान हा मुळातच अतिशय शिस्तशीर देश आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण जगात ज्या पद्धतीनं ‘उपचार’ करावे लागले, लोकांना घराबाहेर पडण्यापासून सक्तीनं मनाई करावी लागली, लॉकडाऊन करावं लागलं, तसे कठोर उपाय जपानला करावे लागले नाहीत. जगातल्या जवळपास सगळ्या देशांतील लोकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या सक्तीचं उल्लंघन करण्यात आलं, पण जपानी लोकांनी सरकारी बंधनांचं उल्लंघन तर जाऊ द्या, पण स्वत:हूनच आपल्यावर बंधनं लादून घेतली. जपानमध्येही कोरोनाचा फैलाव होत असला, तरी तिथलं प्रमाण जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे, याचंही एक प्रमुख कारण म्हणजे जपानी लोकांची शिस्त आणि प्रसंगानुरुप वागण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच जपानमध्ये आजही सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं नाही. त्यापेक्षा मवाळ धोरण अवलंबताना जपानमधील सात प्रांतांमध्ये केवळ आणिबाणी लागू करण्यात आली होती. ‘घरी बसा’ एवढंच लोकांना सांगावं लागलं होतं. आजही त्यात काहीही फरक पडलेला नाही. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंझो अँबे यांनी परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला आणि आता थोडी आणखी कडक पावलं उचलली आहेत. आता संपूर्ण देशात आणिबाणी लागू केली जाणार आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर आजपर्यंत तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ जपान सरकारवर आलेली नाही. जपानमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर काल; गुरुवारपर्यंत तेथील कोरोना रुग्णांची संख्या आहे 8500 आणि मृत्युमुखी पडेल्यांची संख्या आहे 136. 

Web Title: Japan imposed Emergency due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.