जपानचे पंतप्रधान शिंजो अबे पायउतार होणार; प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:04 PM2020-08-28T12:04:23+5:302020-08-28T13:39:19+5:30

वारंवार प्रकृती बिघडत असल्यानं पंतप्रधानपद सोडणार; लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Japan Prime Minister Shinzo Abe Health Deteriorated Will Resign From Pm Post | जपानचे पंतप्रधान शिंजो अबे पायउतार होणार; प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देणार

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे पायउतार होणार; प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देणार

Next

टोकियो: जपानचे पंतप्रधान शिंजो अबे प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देणार आहेत. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यामुळेच अबे पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे राजीनामा देणार असल्याचं वृत्त समोर येताच जपानचा शेअर बाजार कोसळला.

जपामधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.  प्रकृतीच्या कारणास्तव अबे लवकरच पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त जपानमधील माध्यमांनी दिलं आहे. गेल्या आठवड्यात अबे यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यांच्यावर सात तास उपचार झाले. अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.

अबे ८ वर्षांपासून पंतप्रधानपदी आहेत. सर्वाधिक काळ जपानचं नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्यानं जपानमध्ये अबे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यांच्या पक्षावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. ६५ वर्षांच्या अबे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं. चीनपासून असलेला धोका लक्षात घेता अबे यांच्याकडून सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत.

Web Title: Japan Prime Minister Shinzo Abe Health Deteriorated Will Resign From Pm Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.