चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 04:02 PM2020-07-19T16:02:30+5:302020-07-19T20:37:44+5:30
अमेरिकाही चीनमधून अमेरिकन कंपन्यांना बाहेर काढणार आहे. यासाठी अॅपलने तैवानच्या मोठ्या कंपनीला भारतात बस्तान हलविण्यास सांगितले आहे. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवी दिल्ली : कोरोना आणि विस्तारवाद यामुळे जगातील साऱ्याच देशांनी चीनवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. भारताने 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली होती. पण भारतापेक्षाजपानच चीनला जबरदस्त दणका देण्याच्या तयारीला लागला आहे. जपान सरकारने आपल्या कंपन्यांना चीनमधून मागे बोलावले आहे. यासाठी कंपन्यांना येणारा सारा खर्च सरकारच करणार आहे.
जपानच्या 57 कंपन्यांचे चीनमध्ये प्रकल्प आहेत. या कंपन्यांना जपानने माघारी बोलावले आहे. या कंपन्यांनी हे प्रकल्प जपानमध्ये हलवावेत आणि यासाठी येणारा 53.6 कोटी डॉलरचा खर्च सरकार उचलणार असल्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. एवढेच नाही तर अन्य 30 कंपन्या ज्या चीनमध्ये नाहीत परंतू व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आहेत त्यांनाही जपानमध्ये स्थलांतर करण्यासाठी सरकार पैसे देणार आहे. निक्केई वृत्तपत्रानुसार जपान सरकार यासाठी एकूण 70 अब्ज येन खर्च करणार आहे. चीनविरोधात उभे ठाकणाऱ्या देशांमध्ये आणखी एका देशाचे नाव आहे. तो म्हणजे तैवान, 2019मध्ये तैवानने अशीच योजना बनविली होती. कारण चीन दुसऱ्या देशांचा सन्मान करत नाही आणि त्यांच्या सार्वभौमत्वावर काळी नजर ठेवून असतो.
अमेरिकाही चीनमधून अमेरिकन कंपन्यांना बाहेर काढणार आहे. यासाठी अॅपलने तैवानच्या मोठ्या कंपनीला भारतात बस्तान हलविण्यास सांगितले आहे. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अनेक चिनी कंपन्यांना भारतासह हे देश बॅन करू लागले आहेत. चीनची टेलिकॉम क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी हुवावेला अमेरिकेनंतर युरोपमध्येही बॅन करण्यात आले आहे. तर भारताने चीनची 69 अॅप बॅन केली आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल का? शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
अमेरिकेत नाही भारतात! कोरोनाने अख्खे कुटुंब संपवले; सहाव्याची मृत्यूशी झुंज
डायनामाईटने SBI चे एटीएम उडविले; 23 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर