उत्तर कोरियाच्या आक्रमणापासून बचाव करणारी अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली घेण्यास जपानचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:37 AM2020-06-26T02:37:07+5:302020-06-26T07:03:59+5:30

या संरक्षणप्रणालीसाठी आजवर जी किंमत मोजली आहे त्याचे व खरेदी कराराचे काय करायचे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Japan refuses to adopt US missile defense system to defend against North Korean aggression | उत्तर कोरियाच्या आक्रमणापासून बचाव करणारी अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली घेण्यास जपानचा नकार

उत्तर कोरियाच्या आक्रमणापासून बचाव करणारी अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली घेण्यास जपानचा नकार

Next

टोकियो : अमेरिकी क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली तैनात करण्याची योजना जपानने रद्द केली आहे. उत्तर कोरियाच्या वाढत्या धमक्यांमुळे ही अत्यंत महागडी सुरक्षाप्रणाली तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी सांगितले की, आता आम्ही आमच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेऊ व नव्याने काय करता येईल, याबाबत निर्णय घेणार आहोत. जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. या संरक्षणप्रणालीसाठी आजवर जी किंमत मोजली आहे त्याचे व खरेदी कराराचे काय करायचे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याबाबतचा प्राथमिक निर्णय संरक्षणमंत्र्यांनी या महिन्याच्या सुरुवातीस जाहीर केला होता. दोन्ही नियोजित प्रणालींपैकी एकाच्या हार्डवेअर डिझाईनची फेररचना केल्याशिवाय त्या लागू केल्या जाऊ शकत नाहीत. ही प्रक्रिया आणखी वेळखाऊ व महागडी असेल, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे एजिस एशोर सिस्टीमची तैनाती रोखण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. यासाठी लागणारे धन व वेळ पाहता, आमच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता, असेही त्यांनी म्हटले होते.
जपान सरकारने २०१७ मध्ये विद्यमान संरक्षणप्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी एजिस एशोर सिस्टीमला दोन क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली तैनात करण्यास मंजुरी दिली होती. यात समुद्रात एजिसयुक्त विध्वंसक व जमिनीवर पॅट्रियट क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार होते.
सूत्रांनी सांगितले की, दोन एजिस एशोरप्रणाली जपानला दक्षिणमध्ये यामगुचीपासून ते उत्तरेला अकितापर्यंत संरक्षण देणार होत्या. या प्रणाली लागू करण्यासाठी प्रथमपासूनच अनेक अडचणी आल्या होत्या. या प्रणाली कोठे तैनात करायच्या, किंमत व देखरेखीच्या बाबतीतही अनेक सवाल उभे राहिले होते.
३० वर्षांचे संचालन व देखभालीची किंमत ४५० बिलियन येन (४.१ बिलियन अमेरिकी डॉलर्स) पर्यंत वाढली होती. याशिवाय स्थानिकांचा विरोध होता.
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, या संरक्षणप्रणालींच्या अर्ध्या मूल्याच्या करारावर जपानने सही केलेली आहे, तसेच हे मूल्य अमेरिकेला दिलेलेही आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी जपानची संरक्षणप्रणाली वाढवण्यावर कायम जोर दिलेला आहे. ते मागील आठवड्यात म्हणाले होते की, ही प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय रद्द झाल्यामुळे देशाला क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. सरकार आपली पूर्वीची क्षमता प्राप्त करण्याचा विचार करणार आहे.
...............................................................
चीनने जपानचीही झोप उडवली
जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी समुद्रात व आकाशातही चीनच्या हालचाली वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चिनी तटरक्षक जहाज वादग्रस्त पूर्व चीन सागर द्वीपोंजवळ जपानी हद्दीत वारंवार येत आहेत. चिनी पाणबुडी नुकतीच जपानच्या दक्षिणी किनाऱ्याजवळून गेली होती.

Web Title: Japan refuses to adopt US missile defense system to defend against North Korean aggression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.