Japan Smiling Classes: कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 04:06 PM2023-06-06T16:06:56+5:302023-06-06T17:06:41+5:30
Japan Smiling Classes: सध्या जपानमध्ये स्मायलिंग क्लासची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
Japan Smile Classes: हसायला पैसे लागत नाहीत, असं म्हणतात. पण जपानमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देत आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कोविड काळात जपानी लोकांनी इतके दिवस मास्क घातले होते की, ते हसणेही विसरले. पण, आता हसण्याचे क्लास लावून ते लोक हसणे शिकत आहेत.
Learning the perfect smile: At a Tokyo art institute, a former radio host Keiko Kawano is coaching her students on perfect smiles https://t.co/bIDG9oIT3spic.twitter.com/1ImgLEGUVp
— Reuters (@Reuters) June 6, 2023
कोरोनाच्या काळात जपानी लोकांनी मास्क घालण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले. याआधीही त्यांनी आजारांपासून बचाव करण्यासाठी मास्क घातले आहेत. त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आहेत. टोकियो आर्ट स्कूलमधील डझनभर विद्यार्थी हातात आरसा घेऊन हसायला शिकत आहेत. हाताने गाल ओढून हसण्याचा सराव करत आहेत. स्माईल कोच किको कावानोच्या क्लासमध्ये जाण्यासाठी लोक फीदेखील भरत आहेत.
जपानी लोकांना मास्क घालण्याची इतकी सवय झालीये की, सरकारने नियम शिथिल केल्यानंतरही ते मास्क घालत आहेत. फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार बंदी उठल्यानंतरही केवळ 8 टक्के जपानी लोकांनी मास्क घालणे बंद केले आहे. मास्क घातल्यामुळे गेल्या तीन वर्षांत, बहुतेक जपानी लोकांसमोर आता मास्कशिवाय सार्वजनिक जीवनात कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Japonya'da gülümsemeyi unutanlara ders veriliyor: Japonya’da, Covid-19 salgını süresince maske kullanmaktan gülümsemeyi unutanlar eğitim alıyor. Tokyo merkezli gülümseme eğitimi merkezi "Egaoiku"nun kurucusu Keiko Kawano, ülkede… #sondakika#haber#gündemhttps://t.co/6hXPYFWIJYpic.twitter.com/4mVwiKlSq9
— EshaHaber (@HaberEsha) June 5, 2023
रेडिओ होस्टने स्माईल कंपनी सुरू केली
किको कावानो ही रेडिओ होस्ट आहे आणि 2017 मध्ये तिने स्माईल कंपनी सुरू केली. कोविड काळात तिला अधिक लोकप्रियता मिळाली. ती लोकांना हसायला शिकवते आणि त्याचे फायदेही सांगते. ती म्हणते की लोक जिममध्ये जाऊन शरीराचे स्नायू मजबूत करतात, पण चेहरा विसरतात. मास्क घालण्याचा नियम शिथिल झाल्यानंतरच तिचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. किको कावानो एका तासाच्या सत्रासाठी सुमारे $55 (सुमारे 4500 रुपये) आकारते. ती पूर्ण-दिवसीय कार्यशाळा देखील घेते, ज्यासाठी ती 80,000 जपानी येन (सुमारे 47,000 रुपये) आकारते.