हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या सस्पेन्स कायम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 11:32 AM2021-12-21T11:32:54+5:302021-12-21T11:33:17+5:30
Sayaka Kanda died : सयाका होक्काइडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. याच हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील एका रूममधून पून तिचा वेदनादायी मृत्यू झाला.
जपान (Japan) ची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सयाका कांडा (Sayaka Kanda) चा २२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. सयाका होक्काइडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. याच हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील एका रूममधून पून तिचा वेदनादायी मृत्यू (Sayaka Kanda died) झाला.
अभिनेत्रीच्या निधनामुळे तिच्या फॅन्सवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सयाका कांडा ३५ वर्षांची होती. १८ डिसेंबरच्या रात्री उंचावरून पडल्यावर ती रक्ताने माखली होती. काही लोकांना ती हॉटेलखाली पडलेली दिसून आली.
रिपोर्ट्सनुसार, सयाकाची रूम हॉटेलच्या २२व्या मजल्यावर होतं. ती तेथूनच खाली पडली होती. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनंतरही तिला वाचवता येऊ शकलं नाही.
कोण आहे सयाका कांडा?
सयाका एक जपानी अभिनेत्री आणि गायिका आहे. ती अभिनेत्री Masaki Kanda आणि पॉप गायक Seiko Matsua यांची एकुलती एक मुलगी होती. सयाकाला डिज्नीच्या Frozen सिनेमा सीरिजमध्ये अन्नाच्या भूमिकेसाठी जपानी भाषेत डब करण्यासाठी ओळखलं जातं.
पोलीस या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सध्या घटनेला संभावित आत्महत्या असं मानून तपास केला जात आहे. पोलिसांना हे षडयंत्र असल्याचाही संशय आहे. दुसरीकडे सयाकाचे निकटवर्ती हे मानायला तयार नाही की, ती आत्महत्या करू शकते.