कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी जपानी सरकार करणार खर्च
By admin | Published: February 25, 2017 12:18 AM2017-02-25T00:18:17+5:302017-02-25T00:18:17+5:30
आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे; परंतु अनेक लोक पैसे कमावण्यासाठी झोपेशी तडजोड करतात आणि जर तुम्हाला झोपण्याचेच पैसे दिले गेले तर
टोकियो : आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे; परंतु अनेक लोक पैसे कमावण्यासाठी झोपेशी तडजोड करतात आणि जर तुम्हाला झोपण्याचेच पैसे दिले गेले तर...? तुम्ही म्हणाल काहीही सांगता; पण हे खरे आहे. जपानमधील सरकार असेच पाऊल उचलणार असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. तंत्रज्ञानात जपान जगात सर्वांत पुढे आहे. येथील लोक अहोरात्र काम करतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच जपान जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तथापि, पुरेशी झोप न होण्याचे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. जपानी सरकारने अलीकडेच ‘डेथ फॉर ओव्हरवर्क’वर श्वेतपत्रिका काढली आहे. गेल्या काही वर्षांत लोकांची पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला आहे. येथे रेस्ट पीरियडसाठी (विश्रांती काळ) कोणताही कायदा नाही, असे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. सरकारने केलेल्या सर्व्हेत १,७०० कंपन्यांपैकी केवळ दोन टक्केच कंपन्या कर्मचाऱ्यांना दररोज आरामासाठी वेळ देत असल्याचे आढळून आले. या समस्येवर मात करण्यासाठी जपान सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी २२ कोटी रुपये काढून ठेवले आहेत. या निधीतून लघु आणि मध्यम उद्योगांनी किमान विश्रांती काळ सुरू करावा यासाठी त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.