शंभरीतल्या जपानी आजीबार्इंनी जिंकली १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा

By admin | Published: April 6, 2015 06:20 AM2015-04-06T06:20:35+5:302015-04-06T06:21:46+5:30

मिको नागाओका या १०० वर्षांच्या जपानी महिलेने १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा एक तास १५ मिनिटे व ५४.३९ सेकंदांत पूर्ण केली आहे.

Japan's Ojibai in the hundreds won the competition for 1500 meters swimming | शंभरीतल्या जपानी आजीबार्इंनी जिंकली १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा

शंभरीतल्या जपानी आजीबार्इंनी जिंकली १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा

Next

टोकिओ : मिको नागाओका या १०० वर्षांच्या जपानी महिलेने १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा एक तास १५ मिनिटे व ५४.३९ सेकंदांत पूर्ण केली आहे. मात्सुयामा येथे शनिवारी झालेली ही स्पर्धा तिने हातोहात जिंकली. १९१४ साली जन्मलेली मिको नागाओका वयाच्या ८२ व्या वर्षी पोहणे शिकली.
ती गुडघादुखी कमी व्हावी म्हणून पोहण्याच्या तलावावर येत असे. सुरुवातीला तिला पोहायला येत नसे; पण हळूहळू व्यायाम म्हणून ती शिकली. शिवाय ती नोह या पारंपरिक जपानी नृत्यनाटिकेतही काम करते. पोहण्यामुळे या कार्यक्रमासाठी आपली अंगकाठी चांगली राहते हेही तिच्या लक्षात आले. तेव्हापासून ती नियमित पोहायला लागली. (वृत्तसंस्था)

Web Title: Japan's Ojibai in the hundreds won the competition for 1500 meters swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.