Jara Hatke: महिलेने भाड्याने घेतलं विमान, हजारो फूट उंचावर पार्टनरसोबत केला रोमान्स, ४५ मिनिटांसाठी मोजले ७४ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:38 PM2022-02-07T13:38:49+5:302022-02-07T13:39:55+5:30

Romance in Flight: एका मॉडेलने हजारो फूट उंचावर हवेत रोमान्स करण्यासाठी विमान भाड्याने घेऊन त्यात पार्टनरसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.

Jara Hatke: Woman rents plane, romance with partner at altitude thousands of feet, Rs 74,000 counted for 45 minutes | Jara Hatke: महिलेने भाड्याने घेतलं विमान, हजारो फूट उंचावर पार्टनरसोबत केला रोमान्स, ४५ मिनिटांसाठी मोजले ७४ हजार रुपये

Jara Hatke: महिलेने भाड्याने घेतलं विमान, हजारो फूट उंचावर पार्टनरसोबत केला रोमान्स, ४५ मिनिटांसाठी मोजले ७४ हजार रुपये

googlenewsNext

न्यूयॉर्क - एका मॉडेलने हजारो फूट उंचावर हवेत रोमान्स करण्यासाठी विमान भाड्याने घेऊन त्यात पार्टनरसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी २४ वर्षीय मॉडेल कजुमी स्क्वीर्ट्सने सांगितले की, अमेरिकेतील लास वेगासवरून उड्डाण करत असताना तिने पार्टनरसोबत रोमान्स केला.

फ्लाईटमध्ये करण्यात येणाऱ्या सेक्ससाठी जगभरामध्ये Mile High Club या टर्मचा वापर केला जातो. फ्लाईटमध्ये सेक्स करणारे लोक स्वत:ला Mile High Club चे सदस्य म्हणवतात. याच अनौपचारिक क्लबमध्ये आता कजुमी हिचा समावेश झाला आहे. डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार कजुमीने सांगितले की, हजारो फूट उंचीवर रोमान्स करण्यासाठी संबंधित एजन्सीचा होकार मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागली. दरम्यान, हा अनुभव खूप रोमांचक होता, असेही तिने सांगितले.

कजुमी स्क्वीर्ट्सने सांगितले की, तिने हे रोमँटिक क्षण कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी तिने विमान भाड्याने घेतले होते. हवेमध्ये रोमान्स करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक कंपन्या औपचारिकपणे जोडप्यांना विमान भाड्याने उपलब्ध करून देतात. लव्ह क्लाऊड नावाची एक कंपनी ४५ मिनिटांच्या अशा फ्लाईटसाठी सुमारे ७४ हजार रुपये चार्ज करतात. तसेच जर कुणाला विमानात लग्न करायचे असेल, तर त्यासाठी ८९ हजार रुपये आकारले जातात. तर भोजनव्यवस्थेसाठी ७४०० हजार रुपये वेगळे द्यावे लागतात.

४० वर्षीय पायलट अँडी जॉन्सन याने Love Cloud नावाच्या या कंपनीची स्थापना केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना अँडी जॉन्सनने सांगितले की, एकदा तर एका जोडप्याने विमानात पायलट आणि एअर हॉस्टेसचा ड्रेस घालून रोमान्स केला होता. फ्लाईटमध्ये बेडरूमसारखा फिल यावा यासाठी डबल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  

Web Title: Jara Hatke: Woman rents plane, romance with partner at altitude thousands of feet, Rs 74,000 counted for 45 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.