जेफ बेझाेस जगात सर्वात श्रीमंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 05:15 AM2020-11-20T05:15:02+5:302020-11-20T05:20:02+5:30

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स, एलन मस्क तिसऱ्या तर मुकेश अंबानी दहाव्या स्थानी

Jeff Bezas is the richest man in the world | जेफ बेझाेस जगात सर्वात श्रीमंत 

जेफ बेझाेस जगात सर्वात श्रीमंत 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाॅशिंग्टन : काेराेना महामारीमुळे जगाला आर्थिक मंदीने विळखा घातला. अनेक कंपन्यांना टाळे लागले, तर दुसरीकडे काही कंपन्यांनी भरारी घेतली आहे. या कंपन्यांच्या मालकांच्या संपत्तीत माेठी वाढ झाली आहे. यापैकी सर्वाधिक वाढ झाली आहे ती स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत. जगातील सर्वात श्रीमंत यादीमध्ये त्यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टाॅप टेनमध्ये रिलायन्स समूहाचे  मालक मुकेश अंबानी यांनीही स्थान मिळविले आहे. 


ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ॲमेझाॅनचे जेफ बेझाेस यांचे 
स्थान कायम आहे. जेफ बेझाेस यांच्याकडे १८५ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे. दुसऱ्या स्थानी मायक्राेसाॅफ्टचे बिल गेट्स आहेत. त्यांच्याकडे १२९ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे, तर एलन मस्क यांच्याकडे ११० अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. मस्क यांची संपत्ती ७.६१ अब्ज डाॅलर्सने वाढली. त्यांच्या वार्षिक कंपनीमध्ये ९२ अब्ज डाॅलर्स एवढी वाढ झाली असून, या यादीत ते अग्रस्थानी आहेत. जेफ बेझाेस यांचा या यादीत दुसरा क्रमांक लागताे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात १६.९ अब्ज डाॅलर्सची वाढ झाली असून, ते या यादीत दहाव्या स्थानी आहेत. 

हे आहेत जगातील १० श्रीमंत व्यक्ती
नाव        कंपनी    संपत्ती अब्ज डाॅलर्समध्ये 
१. जेफ बेझाेस     ॲमेझाॅन             १८४ 
२. बिल गेट्स     मायक्राेसाॅफ्ट          १२९ 
३. एलन मस्क    टेस्ला, स्पेस एक्स    ११० 
४. मार्क झुकेरबर्ग     फेसबुक              १०४ 
५. बर्नार्ड अर्नाल्ट     एलपीएमएच          १०२ 
६. वाॅरेन बफे बर्कशायर     हॅथवे                ८८ 
७. लॅरी पेज         गुगल              ८२.७ 
८. सर्जी ब्रिन        गुगल              ८० 
९. स्टीव्ह बामर     मायक्राेसाॅफ्ट         ७७.५ 
१०. मुकेश अंबानी    रिलायन्स              ७५.५

Web Title: Jeff Bezas is the richest man in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.