जेफ बेजोस यांच्या यानातून 6 जणांची अंतराळ यात्रा; 107 KMचा प्रवास, एक तिकीट 10 कोटींना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:51 PM2022-08-05T17:51:42+5:302022-08-05T17:52:02+5:30

न्यू शेपर्ड अंतराळ यानाने टेक्सासमधील प्रक्षेपण साइट येथून उड्डाण केले. या यानाद्वारे पृथ्वीपासून वर 107 किमीचा प्रवास करण्यात आला आणि त्यानंतर हे अंतराळवीर पॅराशूटद्वारे पृथ्वीवर परतले.

Jeff Bezos' blue origin sent 6 persons to space; journey of 107 KM, one ticket costs 10 crores | जेफ बेजोस यांच्या यानातून 6 जणांची अंतराळ यात्रा; 107 KMचा प्रवास, एक तिकीट 10 कोटींना...

जेफ बेजोस यांच्या यानातून 6 जणांची अंतराळ यात्रा; 107 KMचा प्रवास, एक तिकीट 10 कोटींना...

Next

टेक्सास: अंतराळ प्रवासाबाबत जगातील काही देश खूप पुढे गेले आहेत, यात अमेरिका टॉपवर आहे. यातच इलोन मस्क यांच्या स्पेस-एक्स आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' कंपनीने खासगी अंतराळ सेवा सुरू केली आहे. गुरुवारी ब्लू ओरिजिनचे यान सहा जणांना घेऊन अंतराळात गेले. 

न्यू शेपर्ड अंतराळ यानाने टेक्सासमधील प्रक्षेपण साइट वन येथून उड्डाण केले. या यानातून पृथ्वीपासून वर 107 किमीचा प्रवास करण्यात आला आणि त्यानंतर हे अंतराळवीर पॅराशूटद्वारे पृथ्वीवर परतले. या अंतराळ मोहिमेला फक्त 10 मिनिटे 20 सेकंद लागले. यावेळी अंतराळयानाचा कमाल वेग 2,239 mph, म्हणजे 3,603 किलोमीटर प्रतितास इतका होता.

ब्लू ओरिजिनचा विक्रम 
या उड्डाणासह ब्लू ओरिजिनने नवा विश्वविक्रमही केला आहे. इजिप्त आणि पोर्तुगालचे लोक पहिल्यांदाच अंतराळ पर्यटनाचा भाग बनले. अभियंता सारा साबरी ही पहिली इजिप्शियन आणि उद्योजक मारियो फरेरा अंतराळात जाणारी पहिली पोर्तुगीज बनली आहे. या स्पेस ट्रिपमध्ये कोबी कॉटन, यूट्यूब चॅनल ड्यूड परफेक्टचे सह-संस्थापक, ब्रिटिश-अमेरिकन गिर्यारोहक व्हेनेसा ओ'ब्रायन, तंत्रज्ञान नेते क्लिंट केली थर्ड आणि दूरसंचार कार्यकारी स्टीव्ह यंग यांचाही समावेश होता.

असा होतो अंतराळ प्रवास 
न्यू शेपर्ड स्पेसक्राफ्टमध्ये रॉकेट आणि कॅप्सूल असते. अंतराळात गेल्यानंतर कॅप्सूल रॉकेटमधून बाहेर पडते. यानंतर, कॅप्सूल पृथ्वीवर उतरेपर्यंतचा वेळ 10-11 मिनिटे असतो. या दरम्यान अंतराळवीरांना काही काळ अंतराळातील वातावरण जाणवते. यानंतर पॅराशूटद्वारे कॅप्सूल पृथ्वीवर परतते. हे रॉकेट SpaceX च्या Falcon 9 ऑर्बिटल रॉकेटप्रमाणेच काम करते.

सुमारे 10 कोटी रुपयांचे तिकीट
क्वार्ट्जच्या अहवालानुसार, ब्लू ओरिजिनच्या स्पेसक्राफ्टच्या तिकिटाची किंमत $1.25 दशलक्ष किंवा 9,89,73,750 रुपये आहे. ब्लू ओरिजिनने आतापर्यंत 6 वेळा अंतराळ प्रवास केला आहे. कंपनीने आतापर्यंत 31 लोकांना अंतराळात सफर घडवली आहे. ब्लू ओरिजिनने गेल्या वर्षी जुलैमध्ये बेझोससह तीन जणांना अवकाशात पाठवून या मोहिमेची सुरुवात केली होती.

Web Title: Jeff Bezos' blue origin sent 6 persons to space; journey of 107 KM, one ticket costs 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.