Jeff Bezos अडचणीत, कंपनीतील २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 05:08 PM2021-10-02T17:08:36+5:302021-10-02T17:09:30+5:30
Jeff Bezos : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी १२ ऑक्टोबर रोजी अंतराळामध्ये दुसरे मानवी उड्डाण करणार आहे.
वॉशिंग्टन - जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी १२ ऑक्टोबर रोजी अंतराळामध्ये दुसरे मानवी उड्डाण करणार आहे. मात्र तत्पूर्वी कंपनीच्या २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी जेफ बेजोस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ब्लू ओरिजिन कंपनीमधील परिस्थिती खूप वाईट आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बेजोस स्पेस एक्सचे मालक अॅलन मस्क आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे फाऊंडर रिचर्ड ब्रेनसन यांना मागे टाकण्याच्या शर्यतीमध्ये आहे. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांना सोडून केवळ कंपनीलाच प्राधान्य देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तणावामध्ये काम करावे लागत आहे. कंपनीचे माजी हेड ऑफ एम्प्लॉई कम्युनिकेशन प्रमुख अलेक्झँड्रा यांनी हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, स्पेस कंपनीमध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जात आहे.
येथे महिला सुरक्षित नाही आहे. महिला कर्मचारी प्रत्येक दिवशी लैंगिक छळाच्या शिकार होत आहेत. कंपनीमध्ये महिलांना बेबी गर्ल, बेबी डॉल, स्वीटहार्ट या नावांनी हाक मारली जाते. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी क्षणांबाबत विचारतात. तर ब्लू ओरिजिन कंपनीच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, अलेक्झँड्राला कंपनीमधून दोन वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले आहेत. ब्लू ओरिजिनच्या कुठल्याही कर्मचाऱ्यासोबत भेदभाव किंवा छळासारखी घटना होत नाही. या सर्वापासून बचाव करण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हॉटलाईनची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा २४ तास सुरू असते. त्यावर तक्रार मिळताच कंपनी कारवाई करते.
कंपनीचे अधिकारी महिलांकडून मत घेऊ देत नाहीत. अलेक्झँड्रा यांनी सांगितले की, ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने नासाच्या माजी अंतराळवीराला सांगितले होते की, तुम्ही महिलांऐवजी माझ्याकडून सल्ला घेतला पाहिजे. कारण मी एक पुरुष आहे आणि मी महिलांपेक्षा चांगला सल्ला देऊ शकतो.