Jerusalem: जेरुसलेमच्या अल अक्सा मिशिदीत पोलीस आणि नागरिकांमध्ये हिंसक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:15 PM2022-04-15T13:15:06+5:302022-04-15T13:15:27+5:30
Jerusalem: हजारो मुस्लिम सकाळी नमाजासाठी मशिदीत जमले होते, यादरम्यान पोलिसांसमोबत वाद झाला.
जेरुसलेम:इस्रायलची राजधानी जेरुसलेममधील (Jerusalem) अल-अक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टिनी नागरिक आणि इस्रायलीपोलिस यांच्यात चकमक (Clashes at al aqsa mosque) झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी पहाटे मशिदीत झालेल्या चकमकीत सुमारे 59 पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. हा हिंसाचार कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हजारो मुस्लिम सकाळी नमाजासाठी मशिदीत जमले होते. दरम्यान, इस्रायल पोलीसही मशिदीत घुसले. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हामाणारीत झाले आणि दोन्ही बाजूने मोठा संघर्ष पेटला.
या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. त्यात पॅलेस्टिनी नागरिक पोलिसांवर दगडफेक करताना आणि पोलीसा नागरिकांवर अश्रुधुराचा मारा करताना दिसत आहेत. मात्र, या घटनेबाबत इस्रायली अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.