ब्रसेल्समध्ये अडकलेल्या २४२ भारतीयांना घेऊन जेट एअरवेजचं विमान मायदेशी परतलं
By admin | Published: March 25, 2016 08:30 AM2016-03-25T08:30:58+5:302016-03-25T08:41:42+5:30
ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या 242 भारतीयांना घेऊन निघालेलं जेट एअरवेजच विमान दिल्लीत पोहोचलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २५ - ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या 242 भारतीयांना घेऊन निघालेलं जेट एअरवेजच विमान दिल्लीत पोहोचलं आहे. यामध्ये 28 क्रू मेम्बर्सचादेखील समावेश आहे. अॅम्स्टरडॅम येथून निघालेल्या या विमानाने इंदिरा गांधी विमानतळावर सकाळी 5.30 वाजता लँडींग केलं असल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
जेट एअरवेजने ट्विट करत प्रवाशांचं स्वागत केलं आहे. अॅम्स्टरडॅम येथून निघालेलं विमान 9W 1229 दिल्लीत लँड झाल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यासाठी जेट एअरवेजने आपली 3 विमाने पाठवणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. अॅम्सटरडॅमहून ही विमाने उड्डाण करणार असून मुंबई, दिल्ली आणि टोरंटो या 3 शहरात लँडींग करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यातील मुंबईकडे येणार विमान अडचणीमुळे रद्द करण्यात आलं.
Cheers to our team who's just back from Amsterdam.
— Jet Airways (@jetairways) March 25, 2016
Glad to see you all back home! :) pic.twitter.com/zzypxM6yA3
A big welcome to our guests!
— Jet Airways (@jetairways) March 25, 2016
Flight 9W 1229 from Amsterdam has landed at Delhi @IndEmbassyBrupic.twitter.com/ZO8D0kPkI8
Jet airways flight 9w1229 from Amsterdam to Delhi carrying passengers stuck at #brusselsairport arrived in Delhi pic.twitter.com/TrgUG3eN87
— ANI (@ANI_news) March 25, 2016
Jet airways flight from Amsterdam to Delhi carrying passengers who were stuck at #brusselsairport arrived in Delhi pic.twitter.com/NGqXGktY6k
— ANI (@ANI_news) March 25, 2016