अमेरिकी ड्रोन हल्ल्यात ‘जिहादी जॉन’ ठार?
By admin | Published: November 14, 2015 01:24 AM2015-11-14T01:24:46+5:302015-11-14T01:24:46+5:30
सिरियात ओलिस नागरिकांचे ‘निर्घृण शिरकाण’ करणारा आणि दहशत पसरविण्यासाठी तशी चित्रफीत प्रसारित करणारा कुख्यात ब्रिटिश ‘इसिस’ अतिरेकी मोहम्मद एमवाझी ऊर्फ ‘जिहादी जॉन’
लंडन : सिरियात ओलिस नागरिकांचे ‘निर्घृण शिरकाण’ करणारा आणि दहशत पसरविण्यासाठी तशी चित्रफीत प्रसारित करणारा कुख्यात ब्रिटिश ‘इसिस’ अतिरेकी मोहम्मद एमवाझी ऊर्फ ‘जिहादी जॉन’ हा अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. स्वयंसंरक्षणासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे ब्रिटीश पंतप्रधानांनी सांंगितले असले तरी त्यांनी तो मारला गेला की नाही यावर ठोस भाष्य केले नाही.
खरोखरच ‘जिहादी जॉन’ मारला गेला काय, याची खातरजमा अमेरिका करीत आहे; पण ब्रिटिश पंतप्रधान कॅमरून यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट या कार्यालयाने तो मारला गेल्याची प्रबळ शक्यता वर्तविली आहे. ‘जिहादी जॉन’ मारला गेल्याची ९९ टक्के खात्री अमेरिकी लष्कराला वाटते. ब्रिटिश या अभियानात अमेरिकी लष्कराच्या समन्वयाने काम करीत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. या कारवाईचा तपशील देताना पेंटॅगॉनचे प्रेस सचिव पीटर कुक म्हणाले की, अमेरिकी लष्कराने १२ नोव्हेंबर २०१५ रोजी मोहम्मद एमवाझी याला ‘लक्ष्य’ करून सिरियातील रक्का येथे हवाई हल्ला केला.
त्यात तो मारला गेल्याची आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
इंग्रजी बोलणारा एमवाझी याचा जन्म कथितरीत्या कुवैतमध्ये झाला होता. त्यातले अमेरिकी पत्रकार स्टीवन सोरलोफ आणि जेम्स फोले, अमेरिकी साहायता कर्मचारी अब्दुल रहमान कासिंग, ब्रिटिश साहायता कर्मचारी डेव्हिड हेन्स आणि जपानी पत्रकार केंजी गोटो, तसेच अन्य काही ओलिसांच्या हत्या केल्याचा संशय आहे.