युनोच्या पदकाने जितेंद्र कुमार मरणोत्तर सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:56 AM2019-05-26T04:56:59+5:302019-05-26T04:58:17+5:30
भारतीय पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी प्रतिष्ठेच्या डॅग हॅम्मारर्स्कजोल्ड पदकाने शुक्रवारी मरणोत्तर सन्मान केला.
संयुक्त राष्ट्रे : युद्धग्रस्त डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये युनोच्या शांतता मोहिमेत प्राणाचे बलिदान केलेले भारतीय पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी प्रतिष्ठेच्या डॅग हॅम्मारर्स्कजोल्ड पदकाने शुक्रवारी मरणोत्तर सन्मान केला.
युनोच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचा इंटरनॅशनल डे ऑफ ‘युएन पीसकीपर्स अँड पे होमेज टू दोज हू कुडन्ट रिटर्न’ च्या स्मरणार्थ युनोतील भारताच्या स्थायी मोहिमेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जितेंद्र कुमार यांना बहाल केलेले पदक युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी स्वीकारले. कांगोतील मिशनवर असताना धाडस आणि सर्वोच्च बलिदान केल्याबद्दल ११९ स्त्री आणि पुरुषांना या पदकाने सन्मानीत केले. जगभरातील ३८ देशांतील संयुक्त राष्ट्रांच्या १२ वेगवेगळ््या शांतता मोहिमांत काम केलेले लष्करी आणि पोलीस अधिकारी, आंतरराष्ट्रीय सिव्हील सर्व्हटंस, नॅशनल स्टाफ आणि युनोचे स्वयंसेवक यावर्षीच्या या पदकाचे मानकरी होते.