जेएनयूच्या शिरपेचात नोबेल पुरस्काराचा तुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:37 AM2019-10-15T04:37:32+5:302019-10-15T04:38:20+5:30
अभिजित बॅनर्जी माजी विद्यार्थी : अर्थशास्त्रात केले एम.ए.
नितीन नायगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अभिजित बॅनर्जी यांना ‘नोबेल’ जाहीर झाल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे ते जेएनयूचे पहिलेच माजी विद्यार्थी असल्याचा दावा केला जात आहे.
कोलकाता येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिजित बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमए इकॉनॉमिक्स) प्रवेश घेतला. त्यांनी काही वर्षांपूर्वी १९८१ ते १९८३ या कालावधीत जेएनयूमधील आठवणींना एका कार्यक्रमात उजाळा दिला होता. जेएनयूतील कार्यक्रमात अर्थशास्त्रातील जागतिक दृष्टिकोनांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला होता. विद्यापीठाला नाव कमावून देणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांमध्ये अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होतो.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक, जयती घोष, एस. जयशंकर, निर्मला सीतारामन यांच्यासोबत बॅनर्जी यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो.
अभिजीत बॅनर्जी व प्रसिद्ध राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव जेएनयूतील दिवसांमध्ये वर्गमित्र होते. यापूर्वी अर्थशास्त्रासाठी नोबेल पटकाविणारे अमर्त्य सेन दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक होते. त्यामुळे दिल्लीच्या वाट्याला दुसऱ्यांदा अर्थशास्त्राचे नोबेल आले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॅनर्जी यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर जेएनयूतील अर्थशास्त्र विभागात आनंदाचे वातावरण होते. कुलगुरू प्रो. जगदीश कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू का प्रॉडक्ट है’ या स्लोगनसह सोशल मिडियावरून संदेश पाठविले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टष्ट्वीटवरून बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतिमा मलिन करणाºयांना चपराक
अभिजित बॅनर्जी यांच्या नोबेल पुरस्कारामुळे अनेक अस्वस्थही झाले आहेत. जेएनयूचे विद्यार्थी म्हणजे ‘तुकडेतुकडे गँग’ अशी खिल्ली उडविली जात होती. त्यामुळे अनेकांनी आज टष्ट्वीटर
व फेसबूकवरून जेएनयूच्या
विरोधकांना धारेवर धरणाºया पोस्टही केल्या.
कोण आहेत प्रा. बॅनर्जी
च्माता-पिता : निर्मला व विनायक बॅनर्जी. दोघेही कोलकत्यात अर्थशास्त्राचे प्राध्यापक.
च्शिक्षण : बी.एस्सी. (अर्थशास्त्र), १९८१, पेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता. एम.एस्सी. (अर्थशास्त्र), १९८३, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली. पी.एच.डी.- १९८८ हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका.
च्वैवाहिक जीवन : मूळच्या कोलकात्यातील असलेल्या एमआयटी (अमेरिका) मधील साहित्याच्या प्राध्यापिका अरुंधती टुली यांच्याशी पहिला विवाह व नंतर घटस्फोट त्यानंतर ज्यांना ‘पी.एचडी’साठी ‘गाईड’ म्हणून १९९९ मध्ये मागदर्शन केले, त्या आताच्या पत्नी एश्थर ड्युफ्लोशी २०१५ मध्ये विवाह.
च् ग्रंथसंपदा : ‘व्होलॅटिलिटी अॅण्ड ग्रोथ’ (सन २००५),‘मेकिंग एड वर्क’ (२००५), ‘अंडरस्टँडिंग पॉव्हर्टी’ (२००६), ‘पूअर इकॉनॉमिक्स: ए रॅडिकल रिथिंकिंग आॅफ दि वे टू फाईट ग्लोबल पॉव्हर्टी’ (२०११), ‘हॅण्डबूक आॅफ फील्ड एक्सपरिमेंट््स’ खंड १ व २ (२०१७) आणि ‘ए शॉर्ट हिस्ट्री आॅफ पॉव्हर्टी मेडरमेंट््स’ (२०१९). याखेरीज अनेक नियतकालिके व संदर्भ ग्रंथांतून शोधनिबंध, लेख, विवेचन. चिकित्सा असे विपुल लेखन..