ISIS प्रमुख संपला! अमेरिकन सैन्याने छापा मारताच अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:29 AM2022-02-04T10:29:20+5:302022-02-04T10:48:38+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी ही महत्वाची माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी इस्लामिक स्टेटचा (ISIS) नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती दिली. बिडेन यांनी सांगितल्यानुसार, अमेरिकेच्या सीरियामध्ये छापेमरीदरम्यान अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडवले. सीरियाच्या इदलिब प्रदेशात रात्रीच्या वेळी विशेष सैन्याने केलेल्या छाप्यांमुळे जिहादी गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
बिडेन पुढे म्हणाले, गुरुवारी रात्री झालेल्या ऑपरेशनमध्ये एक प्रमुख दहशतवादी नेता मारला गेला आहे. आमचे सैन्य अबू इब्राहिमला पकडण्यासाठी त्याच्या ठिकाणाजवळ जात होते, पण त्यापूर्वीच त्याने भ्याडपणे स्वतःसह कुटुंबाला बॉम्बने उडवले. यावेळी त्याने स्वतःसह आपल्या कुटुंबाच्या किंवा इतर लोकांच्या जीवाची पर्वा केली नाही.
बिडेन पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या या ऑपरेशनने जगभरातील दहशतवाद्यांना एक मजबूत संदेश गेला आहे. मी अमेरिकन लोकांना दहशतवादी धोक्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या देशाच्या संरक्षणासाठी मी समर्थ आहे. दहशतवाद्यांविरोधत लढण्यासाठी अमेरिकन सैन्य सदैव सतर्क आणि सज्ज असेल, असे बिडे म्हणाले. यापूर्वी अबू बकर अल-बगदादीदेखील 2019 मध्ये अशाच एका कारवाईत मारला गेला होता.