१९९६मध्ये मेलेल्या व्यक्तीला बायडन २०२०ला भेटले? भर भाषणात झाली भलतीच चूक, Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:25 PM2024-02-07T12:25:18+5:302024-02-07T12:28:39+5:30
८१ वर्षीय बायडन यांचे वाढते वय अशा चुकांसाठी जबाबदार असल्याचे सोशल मीडियावर अनेकांचे मत
Joe Biden Emmanuel Macron: सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका प्रचाराच्या भाषणात बायडन यांनी फ्रान्सचेराष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्सचे दिवंगत माजी नेते फ्रँकोइस मिटरँड यांच्या नावात गोंधळ घातला. त्यामुळेच आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून अमेरिकेतील विरोधी पक्ष त्यांची खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत.
नक्की काय घडला प्रकार?
रविवारी लास वेगासमध्ये प्रचार कार्यक्रमाला संबोधित करताना, ८१ वर्षीय बायडन यांनी २०२० मधील G7 बैठकीत भाषणावर मॅक्रॉन यांच्या प्रतिक्रियेबद्दलचा एक किस्सा सांगितला. त्यात बोलताना चुकून ते म्हणाले की, "आणि जर्मनीचे मिटरँड - माफ करा, मला फ्रान्सचे म्हणायचं होतं - त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की, 'तुम्हाला माहिती आहे का, तू किती दिवसांनी इकडे परतला आहात?" त्यावेळेस बऱ्याच उपस्थितांना याचा संदर्भ समजला नव्हता. पण नंतरच्या व्हाईट हाऊसने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ब्रॅकेटमध्ये योग्य नाव मॅक्रॉन असा समावेश करण्यात आला. त्यानंतर हा घोळ सुस्पष्ट झाला.
BIDEN RECENTLY MET WITH A MAN DEAD SINCE 1996 ### pic.twitter.com/ww0AgRAhJ5
— The_Real_Fly (@The_Real_Fly) February 6, 2024
मिटरँड हे दिवंगत नेते
फ्रान्सचे माजी नेते फ्रँकोइस मिटरँड हे 1981 ते 1995 या कालावधीत त्यांच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. 1996 साली त्यांचे निधन झाले.
दरम्यान, बायडन यांना चुकीचे नाव घेतल्याचा हा व्हिडीओ झटपट व्हायरल झाला आणि त्यावरून ट्विटरवर बऱ्याच युजर्स संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्याचे दिसले. इतकेच नवे तर या चुकांबाबत अनेकांनी त्यांचे वाढते वय जबाबदार असल्याचेही म्हटले. बायडन यांच्याकडून भूतकाळातही अशा चुका सार्वजनिक कार्यक्रमातच झाल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्येही त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी एका मृत काँग्रेस महिला नेत्याचे नाव घेत त्यांना स्टेजवर बोलवले. "जॅकी, तू इथे आहेस? जॅकी कुठे आहे? मला वाटतं ती इथे येणार होती," असे ते म्हणाले होते. ते इंडियाना प्रतिनिधी जॅकी वॉलोर्स्की यांचा संदर्भ देत होते, ज्यांचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता.