जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:13 PM2024-09-22T19:13:20+5:302024-09-22T19:14:50+5:30
Joe Biden News: जो बायडेन यांची विसरण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Joe Biden News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वाढत्या वयामुळे त्यांची विस्मरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नावे विसरतात आणि गोंधळून जातात. या कारणामुळेच त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचा दावा केला जातो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान एकाच स्टेजवर असूनही बायडेन पीएम मोदींचे नाव विसरले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
We really don’t have a president.
— Gunther Eagleman™ (@GuntherEagleman) September 21, 2024
Biden completely FORGOT he was at a press conference with the Prime Minister of India.
The entire world is laughing at us.
This guy is COOKED. pic.twitter.com/useM07uh0R
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन डेलावेअरमध्ये क्वाड नेत्यांसोबतच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख करून देणे विसरले. या कार्यक्रमाचा उद्देश ‘कॅन्सर मूनशॉट’ उपक्रम सुरू करणे हा होता. याद्वारे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील कर्करोग कमी करणे हा आहे. पंतप्रधान मोदींची ओळख करून देताना बायडेन गोंधळले आणि त्यांचे नाव विसरले. यानंतर कार्यक्रमाच्या सुत्र संचालकाने लगेचच पीएम मोदींचे नाव घेतले.
बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली
अलिकडच्या काळात बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली आहे. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते आपले भाषण, एखाद्याचे नाव किंवा चेहरा विसरतात. या वर्षी जुलैमध्ये झालेल्या नाटो परिषदेत त्यांनी चुकून युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन असे संबोधले. यामुळेच त्यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेतली आहे.