पहिल्याच अध्यक्षीय भाषणात बायडन यांनी कमला हॅरिस यांचे केले विशेष कौतुक, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 11:59 PM2021-01-20T23:59:53+5:302021-01-21T00:01:51+5:30
Joe Biden First speech : बायडन यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक भाषण करताना आज जो बायडेन यांनी अमेरिकेसमोरच्या समस्या आणि आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची रूपरेषा देशासमोर आणि जगासमोर मांडली. यावेळी बायडन यांनी त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान, कमला हॅरिस यांचा उल्लेख करताना जो बायडन म्हणाले की, कमला हॅरिस ह्या अमेरिेकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. आज आपण एका महिलेला या जबाबदारीच्या पदासाठी शपथ घेताना पाहिले. त्यामुळे काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही असा विचार कधी करू नका. भारतातील तामिळनाडूमध्ये आजोळ असलेल्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षातील अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडन यांना आव्हान दिले होते. मात्र नंतर आपली दावेदारी मागे घेत त्या बायडन यांच्या समर्थक बनल्या होत्या.
Today, we mark the swearing-in of the first woman in American history elected to national office, Vice President Kamala Harris. Don't tell me things can't change: US President Joe Biden pic.twitter.com/NSbToK75uh
— ANI (@ANI) January 20, 2021
दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचा शपथविधी आज कॅपिटल हिल येथे संपन्न झाला. या सोहळ्यात कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष तसेच पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. हॅरिस ह्या अमेरिकेच्या ४९ व्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
Tamil Nadu: Locals light diyas in Thulasendrapuram, the native village of the mother of US Vice President-elect Kamala Harris ahead of her swearing-in. pic.twitter.com/b89WEstmb1
— ANI (@ANI) January 20, 2021