हिरोशिमाला भेट देणार जॉन केरी
By admin | Published: April 11, 2016 02:19 AM2016-04-11T02:19:04+5:302016-04-11T02:19:04+5:30
जी-सात देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी जपानमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून बेचिराख केलेल्या हिरोशिमा शहराला भेट देणार
Next
तोक्यो : जी-सात देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी जपानमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून बेचिराख केलेल्या हिरोशिमा शहराला भेट देणार आहेत. हिरोशिमाला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिलेच परराष्ट्रमंत्री असतील.
जी सात देशांची बैठक दोन दिवस चालणार असून, त्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा होईल. या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते अफगाणिस्तानहून येथे आले. हिरोशिमाच्या पश्चिमेला असलेल्या विमानतळावर त्यांचे विमान उतरले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पुढील महिन्यात जपानच्या दौऱ्यावर येणार आहेत.