Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवर लागू शकते बंदी! कर्करोग होत असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:55 AM2022-02-08T10:55:59+5:302022-02-08T10:56:35+5:30
Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरुद्ध जगभरात 34 हजारांहून अधिक खटले दाखल आहेत.
लंडन: जगातील प्रसिद्ध हेल्थकेयर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) च्या बेबी पावडर (Baby Powder) वर यूनायटेड किंगडम (UK) सह जगभर बंदी घातली जाऊ शकते. कंपनीच्या एका शेअरहोल्डरने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
या देशात आहे बंदी
द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या बेबी पावडरची 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद केली होती. अमेरिकन रेगुलेटरकडून झालेल्या तपासात जॉनसनच्या बेबी पावडरमध्ये Carcinogenic Chrysotile Fibres आढळले होते. यानंतर बेबी पावडरच्या विक्रीत मोठी घट झाली होती.
कंपनीविरोधात हजारो खटले
मिळालेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर जगभर 34 हजारांपेक्षा जास्त खटले दाखल आहेत. यातील बहुतेक खटले महिलांनी दाखल केले आहेत. बेबी पावडरच्या वापराने Ovarian कँसर झाल्याचा दावा महिलांनी केला आहे. परंतू, कंपनीने या सर्व दाव्यांचे खंडन केले असून, त्यांचे पावडर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
Talc जगातील सर्वात सॉफ्ट मिनरल
Talc ला जगातील सर्वात सॉफ्ट मिनरल म्हटले जाते. याची मायनिंग जगातील अनेक देशात केली जाते. Talcचा वापर पेपर, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल कंपन्यात केला जातो. याचा वापर रॅश आणि इतर पर्सनल हायजीनसाठी केला जातो. कधी-कधी Talc चा साठा Asbestos मुळे दूषितही होतो. हे शरीरात गेल्यावर खनिज कँसर होण्याची शक्यता असते.