बांगलादेश दहशतवादी हल्ल्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा सामील

By Admin | Published: July 4, 2016 07:57 AM2016-07-04T07:57:21+5:302016-07-04T09:30:10+5:30

बांगलादेशमधील ढाका शहरात दहशतवादी हल्ला करुन 20 लोकांचा जीव घेणा-या दहशतवाद्यांमध्ये सत्ताधारी पक्ष आवामी लिगमधील नेत्याचा मुलगा सामील असल्याचं उघड झालं आहे

Joining the ruling party's son in a terrorist attack in Bangladesh | बांगलादेश दहशतवादी हल्ल्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा सामील

बांगलादेश दहशतवादी हल्ल्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा सामील

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
ढाका, दि. 04 - बांगलादेशमधील ढाका शहरात दहशतवादी हल्ला करुन 20 लोकांचा जीव घेणा-या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यातील एका दहशतवाद्याचं नाव रोहन इम्तियाज असून सत्ताधारी पक्ष आवामी लिगमधील नेत्याचा मुलगा आहे. रोहनचे वडील एस एम इम्तियाज खान बाबूल आवामी लिगचे नेते असून बांगलादेश ऑलिम्पिक असोसिएशनचे उप सचिव आहेत. 4 जानेवारीला रोहन बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 
 
रोहनसोबत फोटोत दिसणा-या अन्य दोघांचीही ओळख पटली आहे. शमीम मुबाशीर आणि निबारस खान अशी यांची नावे असून दोघेही ढाकामधील नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेत होते. यामधील निबारस खान याच्या फेसबुक पेजवर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत हात मिळवतानाचा फोटो असल्याचंही समोर आलं आहे.  'श्रद्धा कपूर यू ब्यूटी' असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलेलं आहे.

(ढाका हल्ल्याशी इसिसचा संबंध नाही, सर्व हल्लेखोर स्थानिक)
 
ढाक्यामध्ये हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी इसिसचे नसून, बांगलादेशातीलच आहेत अशी माहिती रविवारी बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. जमायतुल मुजाहिदीन या बांगलादेशातच वाढलेल्या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केला अशी माहिती गृहमंत्री असादुझामान खान यांनी दिली. दशकभरापासून बांगलादेशमध्ये या अतिरेकी संघटनेवर बंदी आहे. इस्लामिक स्टेटशी (इसिस) या संघटनेचा काहीही संबंध नाही असे खान यांनी सांगितले. 

(ढाका दहशतवादी हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू)
 
पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसैन तौफीक इमाम यांनी या हल्ल्यासाठी आयएसआयला जबाबदार धरलं होतं. पाकिस्तानच्या आयएसआय आणि जमायतुल मुजाहिदीनचे संबंध जगजाहीर आहेत. आमच्या सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप हुसैन तौफीक इमाम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 
'जर आवामी लिग पक्षातील नेत्याचा मुलगा दहशतवादी होऊ शकतो तर मग जमायतुल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेशी संबंधित कोणतीही गोष्ट परिस्थिती बिघडवू शकते', असा दावा गुप्तचर संघटनेने केला आहे. 
 
याअगोदरही गुप्तचर खात्याने जमायतुल मुजाहिदीन बांगलादेश  आणि जमात-ए-इस्लामीचे सदस्य आपली शिक्षा रद्द व्हावी यासाठी आवामी लिगच्या छताखाली येण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती. आवामी पक्षाचं नाव असल्यास पासपोर्ट आणि व्हिसा मिळणं सोपं होतं. त्यातही भारतामध्ये प्रवेश करणं एकदम सोपं होऊन जातं. आवामी लिगमध्ये दहशतवादी घटक सामील असल्याचा दावा याआधीही एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने केला होता. 
 
ओलिस धरलेले व मृतांमध्ये बहुसंख्य विदेशी नागरिक व दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे हत्याकांड आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने (इसिस) केला होता. होले आर्टिसन बेकरीत घुसून दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री सुरू केलेले हे ओलिस धरून केलेले हत्याकांड सत्र ११ तासांनी शनिवारी संपले. लष्कराने बेकरीवर कारवाई केली त्यात सहा हल्लेखोर ठार झाले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले.
 
हल्लेखोरांनी ओलिसांची ज्या मोठ्या कोयत्याने हत्या केली ती बघता त्यात बंदी घालण्यात आलेल्या स्थानिक जमात- उल- मुजाहिदीन या दहशतवादी गटाचा हात असल्याचे सूचित होते, असे पंतप्रधान शेख हसीना यांचे राजकीय सल्लागार हुसेन तौफिक इमाम यांनी म्हटले. आयएसआय आणि जमातमधील संबंध सर्वांना माहीत आहेत. त्यांना सध्याचे सरकार काढून टाकायचे आहे, असे इमाम दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याकडे महत्त्वाची माहिती आहे, असेही ते म्हणाले.
 
ओलिस धरून ठार मारलेल्यांमध्ये १९ वर्षांची भारतीय तरुणी तारिशी जैन, नऊ इटालियन, सात जपानी, एक बांगलादेशी वंशाचा अमेरिकन, दोन बांगलादेशींचा समावेश आहे. बहुतेक मृतांचा गळा चिरल्याचे आढळले आहे.

Web Title: Joining the ruling party's son in a terrorist attack in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.