Video: संसदच बनली कुस्तीचा आखाडा; अध्यक्षांच्या आदेशानंतर झाला राडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:08 AM2021-12-30T08:08:57+5:302021-12-30T08:09:51+5:30
Jordan Parliament Video : अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर काही खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात संसदेच्या सभागृहात खासदार लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारताना दिसत आहेत.
ससदेत चर्चांदरम्यान अनेकदा आरोप-प्रत्यारोप होताना आपण पाहिलं असेल. आता जॉर्डनच्या संसदेत असे काही घडलं की, ते पाहून सर्वच जण अवाक् झाले आहेत. संसदेच्या सभागृहात काही खासदार एकमेकांशी भिडले, इतकंच नाही तर त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. संसदेतील या हाणामारीचा व्हिडीओही आता समोर आला आहे.
जॉर्डनच्या संसदेत मंगळवारी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. ससंदेच्या कामकाजादरम्यान जेव्हा अध्यक्षांनी एका खासदाराला बाहेर जाण्याचे आदेश दिले, त्यानंतर ससंदेच्या सभागृहात गदारोळ झाला. त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार एकमेकांशीच भिडले. यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार अचानक एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. तसंच यात एकमेकांना मारहाण करतानाही दिसत आहे. १ मिनिटांपेक्षा अधिक असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक खासदार मारहाणी दरम्यान एकत्र येत असल्याचं दिसत आहे. तसंच त्या ठिकाणी सुरू असलेली आरडाओरडही ऐकू येत आहे.
Several deputies traded punches in a brawl in Jordan's parliament after a verbal row escalated when the assembly speaker called on a deputy to leave, witnesses said https://t.co/4WVq2L1Divpic.twitter.com/RqA04SZHeY
— Reuters (@Reuters) December 28, 2021
काही मीडिया रिपोर्ट्नुसार जॉर्डनच्या संसदोश संविधान दुरुस्तीबाबत चर्चा सुरू होती. यादरम्यान, एका खासदाराच्या वर्तणूकीमुळे कामाकाजात बाधा येत असल्याचं सांगत अध्यक्षांनी त्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिले. यानंतर सर्व खासदार एकमेकांशी भिडले. यामद्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. जॉर्डनमध्ये आतापर्यंत २९ वेळा संविधानात दुरुस्ती करण्यात आली आहे.