43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:29 PM2019-04-11T18:29:30+5:302019-04-11T18:30:09+5:30
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली.
बालकोट - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला परदेशी पत्रकारांनी बालकोट परिसरातील स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पाकिस्तानी सैन्याकडून जाणूनबुजून घाई करत स्थानिक जनतेला पत्रकारांशी संवाद साधण्यात टाळत होते. त्यामुळे पाकिस्तानकडून नक्कीच काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला जातो असा संशय निर्माण होतोय.
काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असणाऱ्या बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केलं होतं. मात्र पाकिस्तानकडून बालकोट भागात ज्याठिकाणी भारताने हल्ला केला तिथं दहशतवादी तळ नसून मदरसा चालविण्यात येत होती असा दावा केला होता.
या घटनेनंतर पाकिस्तानकडून माध्यमांना दावा करण्यात आला होता की, आम्ही लवकरच पत्रकारांना ज्या भागात भारताने एअर स्ट्राईक केलं त्याठिकाणी नेण्यात येईल मात्र ते खोटं ठरलं. पाकिस्ताने 43 दिवसानंतर माध्यमांना त्या परिसरात घेऊन जात खोटं दाखविण्याचा प्रयत्न केला. आईएएनएसने बीबीसी वृत्ताचा हलावा देत सांगितले की, इस्लामाबादमधून एक हेलिकॉप्टरमधून आम्हाला घेऊन गेले त्यानंतर मनसेराजवळ हेलिकॉप्टर उतरविण्यात आलं. तेथून पुढे दीड तास अवघड असलेला डोंगराळ भागातील रस्त्यामधून आमचा प्रवास झाला असं तिथे गेलेल्या पत्रकाराने सांगितले.
मिडीयाच्या प्रतिनिधींना तीन वेगवेगळ्या भागात नेण्यात आले. पाकिस्तानकडून त्यांना सांगितले की भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात आमच्या येथील झाडांचे नुकसान झाले मात्र प्रत्यक्षात घटनास्थळावर काही खडडे आणि मुळासकट कोसळलेली झाडं दिसली. हा प्रदेश मानवी वस्तीपासून खूप दूर होता. माध्यमांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचारलं की, पत्रकारांना या ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला एवढा विलंब का झाला? यावर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तणावग्रस्त परिस्थितीत येथे लोकांना आणणं अवघड होतं. आता योग्य वेळ आली म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांचा दौरा नियोजित करण्यात आला असं पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले. तसेच यावेळी मदरसाजवळ असणाऱ्या बोर्डवर मौलाना यूसुफ अजहरचं नावं बघितलं त्यावरही विचारलेल्या प्रश्नांवर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सरळ उत्तर दिलं नाही.