अमेरिकेत लाईव्ह वृत्तांकन सुरु असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या
By admin | Published: August 26, 2015 07:16 PM2015-08-26T19:16:34+5:302015-08-26T19:16:34+5:30
अमेरिकेतील वर्जिनिया येथे वृत्तवाहिनीवर लाईव्ह वृत्तांकन करत असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वर्जिनिया (अमेरिका), दि. २६ - अमेरिकेतील वर्जिनिया येथे वृत्तवाहिनीवर लाईव्ह वृत्तांकन करत असताना पत्रकार व कॅमेरामनची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला असून हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अमेरिकेतील सीबीएस या वृत्तवाहिनीसाठी काम करणारी पत्रकार अॅलिसन पार्कर व कॅमेरामन अॅडम वॉर्ड हे बुधवारी सकाळी वर्जिनियातील मॉनेटा येथे एका महिलेची लाईव्ह मुलाखत घेत होते. या दरम्यान अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने पार्कर व वॉर्डवर गोळीबार केला. लाईव्ह बुलेटिनदरम्यान झालेल्या या घटनेमुळे स्टुडिओत बसलेली अँकरलाही धक्काच बसला. व्हिडीओत फक्त गोळीबार व महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र लाईव्ह कार्यक्रमातच ही घटना घडल्याने वर्जिनियात खळबळ माजली आहे.