अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 01:10 AM2017-04-26T01:10:40+5:302017-04-26T01:10:40+5:30

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून

The journey in the United States alone is the 'Flying Motor!' | अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’

अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून या ‘फ्लार्इंग मशिन’ची विक्री याच वर्षांच्या उत्तरार्धात सुरु करण्याची कंपनीची योजना आहे.
‘गूगल’ या कंपनीचे मुख्यालय असलेल्या कॅलिफोर्नियामधील माऊंटन व्ह्यू शहरातच ही ‘किट्टी हॉक’ कंपनी असून ‘गूगल’चे सह-संस्थापक लॅरी पेग यांनीही या स्टार्ट-अपमध्ये पैसा गुंतविला असल्याचे बोलले जाते.
कंपनीने या उडत्या वाहनास ‘पर्सनल फ्लार्इंग मशिन’ असे म्हटले असून त्याचे एक प्रायोगिक मॉडेल (प्रोटोटाइप) हवेत उडत असतानाचा व्हिडिओही जारी केला आहे.
या भावी उडत्या वाहनाची माहिती देताना ‘किट्टी हॉक’ कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले की, आमचे हे उडते यंत्र पूर्णपणे विजेवर चालणारे, सुरक्षित आणि चाचण्यांमध्ये खरे उतरलेले आहे. विनागजबजलेल्या भागांमध्ये उडण्यासाठी अतिहलके विमान म्हणून ते अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाच्या नियमांत बसते. ते चालविण्यासाठी वैमानिक परवाना घेण्याची गरज नाही. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर कोणीही ‘हे फ्लार्इंग मशिन’ चालवू शकेल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वाहनाला फिरणारे आठ पंखे आहेत. त्याचे वडन सुमारे १०० किलो (२२० पौंड) असून ते जमिनीपासून १५ फूट उंचीवरून ताशी २५ मैल (४० किमी) वेगाने उडू शकते. हे उडते वाहन या वर्षाच्या अखेरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे नमूद करून कंपनीने इच्छुक ग्राहकांची प्रतिक्षायादी तयार करण्यासाठी प्रत्येकी १०० डॉलर भरून सदस्यनोंदणी योजनाही जाहीर केली आहे. प्रतिक्षायादीवरील ग्राहकांना सवलतीच्या किंमतीत हे ‘फ्लार्इंग मशिन’ दिले जाईल. मात्र त्याची किंमत अद्याप ठरलेली नाही. स्टॅनफर्ड विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक सेबेस्टियन थ्रुन हे ‘किट्टी हॉक’ स्टार्ट-अपचे अध्यक्ष आहेत. ‘गूगल’ची स्वचालित मोटारीची योजनाही त्यांचीच होती. आमचे ‘फ्लार्इंग मशिन’ व्यक्तिगत प्रवासाचे भवितव्य आमूलाग्र बदलून टाकेल’, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. कॅमेरून रॉबर्टसन आणि टॉड रीचर्ट हे या नवकल्पनेमागचे मुख्य अभियंते आहेत.
जणू उडती मोटारसायकल
लेखकसिमेरॉन मॉरिसे यांनी या ‘फ्लार्इंग मशिन’चे चाचणी उड्डाण करून पाहिल्यानंतर आपला अनुभव एका ब्लॉहमधये लिहिला. ते म्हणतात, हे ‘प्रोटोटाइप म्हणजे जणू उडती मोटारसायकलच आहे. बाईकवर जसे तुम्ही थोडेसे पुढे झुकून सीटवर बसता तसेच यावरही बसावे लागते. मला माझे हवेत उडण्याचे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.

Web Title: The journey in the United States alone is the 'Flying Motor!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.