झुकरबर्गचं डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर, ट्रम्पविरोधी असल्याचा केला होता आरोप
By सागर सिरसाट | Published: September 28, 2017 12:41 PM2017-09-28T12:41:16+5:302017-09-28T19:20:03+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. जगभरात सर्वाधिक वापरलं जाणा-या फेसबुकवर हा आरोप केल्यामुळे अनेकांनी ट्विटरवर ट्रम्प यांना ट्रोल केलं तर लगेचच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकने 2016 अमेरिकेच्या राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या चौकशीत मदत करण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे फेसबुकविरोधात ट्रम्प यांचा हा संताप त्याच्याशीच जोडून पाहिला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटकरून फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी राहिला आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यू यॉर्क टाइम्स हे देखील ट्रम्पविरोधी राहिले आहेत, न्यू यॉर्क टाइम्सला तर चुकीची बातमी दाखवल्यामुळे माफी देखील मागावी लागली. हे सगळं षडयंत्र आहे का? असा आरोप केला. दुस-या ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांचा मात्र मला पाठिंबा आहे, गेल्या 9 महिन्यात जे मी केलं ते कोणत्याच राष्ट्रपतीला जमलेलं नाही..येथील अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे... असं म्हटलं.
Facebook was always anti-Trump.The Networks were always anti-Trump hence,Fake News, @nytimes(apologized) & @WaPo were anti-Trump. Collusion?
— Donald J. Trump (@realDonaldTrump) September 27, 2017
..But the people were Pro-Trump! Virtually no President has accomplished what we have accomplished in the first 9 months-and economy roaring
— Donald J. Trump (@realDonaldTrump) September 27, 2017
ट्रम्प यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आणि त्यावर अपेक्षेप्रमाणे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर एका पोस्टद्वारे उत्तर दिलं.
मला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी ट्विट करून केलेल्या आरोपांना उत्तर द्यायचं आहे. त्यांनी फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी राहिला असल्याचा आरोप केला आहे. मी नेहमीच सर्वांना एकत्र आणण्याचा आणि सर्वांसाठी एक वेगळा समाज बनवण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचा आवाज ऐकला जावा आणि असा एखादा प्लॅटफॉर्म असावा ज्यामध्ये समाजातील सर्व घटकांना त्यांची बाजू मांडता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ट्रम्प म्हणतात फेसबुक त्यांच्या विरोधात आहे, उदारमतवादी(लिबरल) म्हणतात फेसबुकने ट्रम्प यांची मदत केलीये. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना न आवडणा-या गोष्टी दिसल्यामुळे दोघंही नाराज आहेत.
या पोस्टमध्ये झुकरबर्ग यांनी काही तथ्य समोर ठेवले आहेत. यामध्ये 2016 च्या अमेरिकेच्या राष्ट्रपतिपद निवडणुकीत फेसबुकने महत्वाची भूमिका निभावल्याचं मान्य केलंय पण अनेकजण ज्या प्रमाणे बोलत आहेत तशा भूमिकेत फेसबुक नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अखेरीस त्यांनी फेसबुक यापुढेही निष्पक्षपणे निवडणुकीसाठी काम करत राहिल असं ते म्हणाले आहेत.
झुकरबर्गने केलेली फेसबुक पोस्ट -