23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज

By admin | Published: June 24, 2016 11:24 AM2016-06-24T11:24:13+5:302016-06-24T12:31:19+5:30

यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत

June 23 Let your freedom day - Niigel Fariez | 23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज

23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज

Next
ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 24 - यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत. ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान करुन युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 23 जूनची इतिहासात स्वातंत्र्यदिवस म्हणून नोंद होऊ दे असंही ते बोलले आहेत. 
 
ब्रिटन आता स्वातंत्र्य होण्याचं स्वप्न मी पाहू शकतो. आपण अनेक देशांशी लढा दिला आहे. मोठ्या राजकारणाला आपण सामोरे गेले आहोत. आपण खोटारडेपणा, भ्रष्टाचार आणि लबाडीशी लढलो आहोत असं नीजेल फारएज बोलले आहेत.
 
युरोपियन महासंघात राहावं की नाही ? यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या बाजूने कौल दिला आहे.  हा ऐतिहासिक निकाल असून याचा परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर होणार आहे.. ब्रिटनमधील 52 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48 टक्के लोकांना राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिल्याचं वृत्त बीबीसने दिलं आहे. सार्वमत चाचणीत 4 कोटी 65 लाख 1 हजार दोनशे 41 (4,65,01,241) म्हणजेच 71.9 टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. ब्रिटनच्या निवडणुकीत 1992 पासून झालेल्या मतदानाचा हा उच्चांक आहे.
 

Web Title: June 23 Let your freedom day - Niigel Fariez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.