Justin Trudeau: कॅनडाच्या पंतप्रधान निवासाला २०००० ट्रकनी घेरले; जस्टिन ट्रूडो गुप्त ठिकाणी पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 10:32 AM2022-01-30T10:32:43+5:302022-01-30T10:33:10+5:30
Justin Trudeau, Truckers protest Canada: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्रक चालकांना पाठिंबा दिला आहे. कॅनडाच्या ट्रक चालकांचे राज्य. या आंदोलनाची हाक आता अमेरिकेपर्यंत दिसत आहे, असे ट्विट मस्क यांनी केले आहे. या ट्रक चालकांना अन्य आंदोलकांचाही पाठिंबा मिळत असल्याने कॅनडातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
ओटावा: वेगवेगळ्य़ा वक्तव्य़ांनी चर्चेत असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंना त्यांच्या निवासस्थानावरून पलायन करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला जवळपास २० हजार ट्रकनी घेरले असून ट्रूडोंना गुप्त ठिकाणी लपण्यासाठी घर सोडावे लागले आहे. परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, जवळपास ७० किमीपर्यंत लांबलचक ट्रकच्या रांगा लागल्या आहेत.
जवळपास ५० हजार ट्रकचालकांनी ट्रुडो यांचे निवासस्थान घेरले आहेत. कॅनडा या देशात कोरोना लसीकरण सक्तीचे करणे आणि लॉकडाऊन लावण्यावरून ट्रक चालकांनी विरोध केला आहे. ट्रक चालकांनी या ७० किमी लांबीच्या ताफ्याला 'फ्रीडम कॉन्वेय' असे नाव दिले आहे.
अमेरिकेची सीमा पार करण्यासाठी कोरोना लस घेतलेली असणेबंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे हजारो ट्रक चालकांनी यास विरोध दर्शविला आहे. याचवेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्रक चालकांना महत्व वाटत नसलेले अल्पसंख्यांक अशी उपमा दिल्याने हे ट्रकवाले भडकले आहेत. परिस्थिती एवढी बिघडली आहे की राजधानी ओटावामध्ये रस्त्यांवर सर्वत्र ट्रकच ट्रक दिसत आहेत.
एलन मस्क ट्रकचालकांच्या मदतीला
दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्रक चालकांना पाठिंबा दिला आहे. कॅनडाच्या ट्रक चालकांचे राज्य. या आंदोलनाची हाक आता अमेरिकेपर्यंत दिसत आहे, असे ट्विट मस्क यांनी केले आहे. या ट्रक चालकांना अन्य आंदोलकांचाही पाठिंबा मिळत असल्याने कॅनडातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.
हजारो महाकाय ट्रक्सचे आवाज सतत रस्त्यावर ऐकू येत असून चालक सातत्याने हॉर्न वाजवून सरकारचा निषेध करत आहेत. ते संसदेत पोहोचले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाचे पंतप्रधान आपल्या कुटुंबासह घरातून सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी पळून गेले आहेत. ट्रुडो हे बहुतांश आंदोलकांचे लक्ष्य आहेत. पीएम ट्रूडो म्हणाले की ट्रकचालक विज्ञानविरोधी आहेत आणि ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर कॅनडियन लोकांसाठीही धोका निर्माण करतात. कॅनडामध्ये आतापर्यंत ८२ टक्के लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे.