कायमच मोडला अर्ध्यावर डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:08 AM2017-07-29T04:08:52+5:302017-07-29T04:08:57+5:30

‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

kaayamaca-maodalaa-aradhayaavara-daava | कायमच मोडला अर्ध्यावर डाव

कायमच मोडला अर्ध्यावर डाव

Next

इस्लामाबाद : ‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कधी राष्ट्रपती कार्यालयामुळे, तर कधी लष्कराच्या उठावामुळे आणि आता न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या हातून सत्ता गेली.
पाकिस्तानच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आणि राजकारणातील एक मोठे कुटुंब म्हणून नवाज शरीफ यांच्याकडे बघितले जाते. जून २०१३ मध्ये ते तिसºयांदा पंतप्रधान झाले. या काळात अनेक अडचणीही आल्या; पण पनामागेट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान एका राजकीय संकटात सापडला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणि वाढता दहशतवाद यांचे आव्हान समोर असतानाच देशात राजकीय संकट उभे ठाकले आहे. एक सक्षम नेते म्हणून ओळख असलेले शरीफ पनामा प्रकरणात मात्र स्वत:च समस्यांमध्ये अडकले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर विदेशात अवैध संपत्ती घेणे, ब्रिटिश आयलँडमध्ये कंपनी सुरू केल्याचा आरोप होता. याबाबत राष्ट्राला उद्देशून भाषण करताना शरीफ यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाचा उल्लेख केला होता. आपल्या दिवंगत वडिलांनी व्यवसायाची उभारणी केली होती. लंडन आणि अन्य ठिकाणी खरेदी केलेल्या संपत्तीचा हा व्यवसायच स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पोलिसांची भूमिका पक्षपाती
जेआयटीने १० जुलै रोजी आपला अहवाल न्यायालयाला सोपविला होता आणि शरीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण दाखल करण्याची शिफारस केली होती. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत शरीफ यांनी तेव्हा राजीनामा देण्यास नकार दिला होता. २०१३ च्या निवडणुकीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. शरीफ यांचा जन्म १९४९ मध्ये लाहोरमध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. इंग्रजी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी वडिलांच्या स्टील कंपनीत काम सुरू केले. त्यानंतर शरीफ यांनी राजकारणात प्रवेश केला. अगोदर अर्थमंत्री आणि नंतर ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. १९९० मध्ये ते पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आता तिसºयांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, पनामा प्रकरणाने ते हा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

Web Title: kaayamaca-maodalaa-aradhayaavara-daava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.