Kabul Airport Explosion: दहशतवाद्यांना सोडणार नाही; जो बायडेन यांचा आयएसआयएसला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:26 AM2021-08-27T06:26:27+5:302021-08-27T07:24:12+5:30
Kabul Airport Bomb Blast: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले.
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले. याची जबाबदारी आयएसआयएस दहशतवादी संघटनेने घेतली असून या हल्ल्यात 12 अमेरिकी सैनिकांसह 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्याची शिक्षा त्यांना देऊ, असा इशारा दिला आहे. (Twelve US servicemen were killed and 15 injured in the attacks in Kabul. )
बायडेन म्हणाले, आम्ही माफ करणार नाही, विसरणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून मारू आणि शिक्षा देऊ. आम्ही अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांना वाचविणार आहोत. तसेच अफगाण सहकाऱ्यांना बाहेर काढी. आमचे मिशन सुरुच राहिल. काबुल विमानतळावर झालेल्या या हल्ल्यात अद्याप तालिबान आणि आयएसआयएस दरम्यान काही संबंध आढळलेला नाही.
"We will not forgive. We'll not forget. We will hunt you down and make you pay," US President Joe Biden to Kabul bombers pic.twitter.com/H3BFTLzZ77
— ANI (@ANI) August 26, 2021
बायडेन यांनी तीनवेळा हल्ल्याचा संशय व्यक्त केलेला
काबुल विमानतळावर आयएसआयएस हल्ला करण्याची शक्यता बायडेन यांनी तीनवेळा व्यक्त केली होती. 20 ऑगस्टला त्यांनी विमानतळावर किंवा त्याच्या आजुबाजुला असलेल्या कोणत्याही दहशतवादी संकटावर नजर ठेवून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या आयएसआयएसचे दहशतवादी आहेत, जे जेल तोडल्यानंतर बाहेर पडले आहेत, असे म्हटले होते.
The terror group ISIS-K claimed responsibility for the deadly double attack at Kabul airport on the group's Telegram account: SITE monitoring
— ANI (@ANI) August 26, 2021
15 सैनिक जखमी
काबुल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन ब़ॉम्बस्फोट झाले यामध्ये 12 अमेरिकी सैनिक ठार झाले. रात्री उशिरा अमेरिकी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. यामध्ये 11 मरीन आणि एक नेव्हीचा सैनिक आहे. तर 15 सैनिक जखमी झाले आहेत. सुरुवातीला 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, नंतर हा आकडा 60 पर्यंत वाढला. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.
"Twelve US servicemen were killed and 15 injured in the attacks in Kabul. Despite this attack, we're continuing the mission of evacuation," says Commander of US Central Command, Marine Corps General Kenneth F McKenzie Jr pic.twitter.com/v9mTvmqnlB
— ANI (@ANI) August 26, 2021
‘आयसिस’च्या खाेरासान गटाने हा हल्ला केल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी हा आत्मघातकी हल्ला केला. त्यापैकी दाेन मानवी बाॅम्ब हाेते. त्यांनी स्वत:ला बाॅम्बस्फाेटाने उडविले, तर तिसऱ्या दहशतवाद्याने बेछूट गाेळीबार सुरू केला. त्याने एका उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या दिशेनेही गाेळीबार केला. मात्र, विमान सुखरूप उडाले. पहिला बाॅम्बस्फाेट विमानतळाच्या आत धावपट्टीजवळ झाला. आत्मघातकी हल्लेखाेर लाेकांच्या गर्दीत शिरला, तर दुसरा स्फाेट हाॅटेल बॅरनबाहेर झाला. हॉटेल बॅरन हे विमानतळाजवळ असून ब्रिटनचे सैनिक तेथे मुक्कामाला आहेत.
बाॅम्बस्फाेट झाल्यानंतर विमानतळाबाहेर प्रचंड गाेंधळ झाला. स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना कचऱ्याच्या गाड्यांमध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले. बाॅम्बस्फाेट अतिशय तीव्र हाेते. त्यामुळे मृतांच्या शरीराचे तुकडे झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही जणांनी याबाबतची छायाचित्रे आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले. (वृत्तसंस्था)