काबुलमधील स्फोटात ८० ठार
By admin | Published: July 23, 2016 04:17 PM2016-07-23T16:17:34+5:302016-07-24T05:18:17+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अल्पसंख्याक हजारा लोकांच्या मोर्च्यात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात ८० ठार, तर २३१ जण जखमी झाले
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अल्पसंख्याक हजारा लोकांच्या मोर्च्यात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात ८० ठार, तर २३१ जण जखमी झाले. शनिवारी करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (आयएस) घेतली आहे. विद्युतवाहिनीचे स्थलांतर करून ती आमच्या अविकसीत प्रांतातून न्यावी या मागणीसाठी हजारा लोकांनी काबुलमध्ये विशाल मोर्चा काढला होता. आत्मघाती हल्लेखोराने मोर्चेकºयांत घुसून स्फोट घडवून आणला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान, पोलीस कर्मचारी आणि नागरीक ठार झाले, असे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद इस्माईल यांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला. ते म्हणाले की, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)