काबूलमध्ये स्फोट, खासदारासहित तिघे जखमी
By admin | Published: December 28, 2016 02:52 PM2016-12-28T14:52:31+5:302016-12-28T14:52:31+5:30
बमियान प्रांतातील खासदार फाकुरी बेहिस्ती यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 28 - शहरात झालेल्या स्फोटात अफगाणमधील खासदारासहित तिघेजण जखमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींवर वारंवार हल्ले होत आहेत. बमियान प्रांतातील खासदार फाकुरी बेहिस्ती यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. फाकुरी बेहिस्ती संसदेत जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्यावर हा हल्ला झाला.
'पुलाच्या खाली बॉम्ब लावण्यात आला होता. फाकुरी बेहिस्ती यांची गाडी पुलावर पोहोचताच स्फोट घडवण्यात आला', अशी माहिती अंतर्गत कामकाज मंत्री नाजीब दानिश यांनी दिली आहे. फाकुरी बेहिस्ती यांच्यासहित अन्य दोघे या स्फोटात जखमी झाले आहेत. मात्र संसद अध्यक्ष अब्दुल रौफ इब्राहिमी यांनी खासदाराच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
Afghan MP Fakuri Behishti wounded and bodyguard killed in an IED blast in Kabul city: TOLO News
— ANI (@ANI_news) 28 December 2016
गेल्याच आठवड्यात तालिबानी आत्मघाती हल्लेखोरांनी खासदाराच्या घरावर हल्ला केला होता, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. तब्ब्ल 10 तास ही धुमचक्री चालू होती. हल्ल्यातून खासदार बचावले होते पण त्यांची दोन नातवंडे आणि सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.