काबूल तिस-या बॉम्बस्फोटानं हादरलं, आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

By admin | Published: September 6, 2016 02:26 AM2016-09-06T02:26:09+5:302016-09-06T08:11:13+5:30

काबूलचा मध्यवर्ती भाग मध्यरात्रीच्या सुमारास तिस-या बॉम्बस्फोटानं हादरला.

Kabul blasts third blast, so far 24 deaths | काबूल तिस-या बॉम्बस्फोटानं हादरलं, आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

काबूल तिस-या बॉम्बस्फोटानं हादरलं, आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
अफगाणिस्तान, दि. 6 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती भाग मध्यरात्रीच्या सुमारास तिस-या बॉम्बस्फोटानं हादरला. तर या आधी काबूलमध्ये सोमवारी झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक जण जखमी आहेत.

दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे तिन्ही स्फोट करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबान या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या बॉम्बस्फोटाच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. "अफगाणिस्तानच्या शत्रू राष्ट्रांमध्ये सुरक्षा आणि संरक्षण दलांच्या माध्यमातून लढण्याची क्षमता नसल्यानंच अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवण्याची कृत्ये करतात," असं म्हणत गनी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

Web Title: Kabul blasts third blast, so far 24 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.