कडवा प्रचारक अबू हमझाला जन्मठेप

By admin | Published: January 11, 2015 12:25 AM2015-01-11T00:25:05+5:302015-01-11T00:25:05+5:30

कडवा धर्मप्रचारक अबू हमझा याला अमेरिकेतील एका न्यायालयाने जन्मठेप सुनावली.

Kadva campaigner Abu Hijazala lifelong | कडवा प्रचारक अबू हमझाला जन्मठेप

कडवा प्रचारक अबू हमझाला जन्मठेप

Next

न्यूयॉर्क : कडवा धर्मप्रचारक अबू हमझा याला अमेरिकेतील एका न्यायालयाने जन्मठेप सुनावली. दहशतवाद, अपहरण तसेच अल काईदा, तालिबानला मदत करण्यासह ११ आरोपांखाली अबू हमझाला दोषी ठरविण्यात आले होते.
अबू हमझा याचे पूर्ण नाव मुस्तफा कमेल मुस्तफा आहे. १९९८ मध्ये येमेनमध्ये १६ पाश्चिमात्य पर्यटकांच्या अपहरणकांडात त्याने अपहरणकर्त्यांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून दिल्याचा आरोप होता. १९९९ मध्ये ओरेगॉन येथे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करून हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा जावई आणि अल काईदाचा प्रवक्ता सुलेमान अबू घैत याच्यानंतर अमेरिकी न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेला अबू हमझा हा दुसरा मोठा दहशतवादी होय.
एकाक्ष आणि कृत्रिम हात असलेला अबू हमझा याने स्वत:च्या कृत्याबाबत जराही खेद व्यक्त न करता निरपराध असल्याचे सांगत तुरुंगातील इस्पितळात रवानगी करण्याची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Kadva campaigner Abu Hijazala lifelong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.