अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:08 AM2020-09-11T00:08:05+5:302020-09-11T00:08:10+5:30
आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे.
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे उड्डाण करणाऱ्या एका अमेरिकी व्यावसायिक मालवाहक अंतराळ यानाला दिवंगत कल्पना चावलाचे नाव देण्यात आले आहे. मानवी अंतराळ यानात तिच्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान दिला जात आहे. कल्पना अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती.
अमेरिकी वैश्विक एरोस्पेस व संरक्षण तंत्रज्ञान कंपनी नॉर्थग्रुप ग्रमॅनने याबाबत घोषणा करताना म्हटले आहे की, आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे. कल्पनाचा २००३ मध्ये कोलंबिया अंतराळ यानात स्वार असताना चालक दलाच्या सहा सदस्यांसह मृत्यू झाला होता.
कंपनीने टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कल्पना चावला मूळ भारतीय वंशाची पहिली अंतराळ प्रवासी होती व तिच्या सहभागाने नासामध्ये इतिहास लिहिला गेला आहे. मानवी अंतराळ यानात तिच्या योगदानाचा दीर्घकाळपर्यंत प्रभाव राहील. च्कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, नॉर्थरोप ग्रमॅन एनजी-१४ सिग्नस अंतराळ यानाचे नाव कल्पना चावला ठेवणे, ही अभिमानाची बाब आहे.
च्मानवयुक्त अंतराळायानात महत्त्वाची भूमिका बजावणाºया व्यक्तीचे नाव प्रत्येक सिग्नसला देणे, ही कंपनीची परंपरा आहे. कल्पना ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला असल्यामुळे हा सन्मान देण्यात येत आहे.