सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:08 PM2024-11-04T20:08:59+5:302024-11-04T20:09:19+5:30

५ नोव्हेंबरला निवडणूक आहे, अशातच रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक पार्टींमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे.

Kamla Harris vs Donald Trump: Conflict in seven states, Trump leading in one; The world's eyes were on the US vote | सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या

सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या

अमेरिकेत उद्या राष्ट्राध्य़क्ष निवडणूक होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच आघीडीवर होते. सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची उमेदवारी बदलून ती भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना देण्यात आली आणि ट्रम्प यांना टक्कर मिळू लागली. सध्याच्या परिस्थितीनुसारच्या सर्व्हेमध्ये ट्रम्प आणि हॅरीस या दोघांचीही लोकप्रियता ४८ टक्क्यांवर आहे. यामुळे ही निवडणूक घासाघाशीत सुटण्याची शक्यता आहे. 

५ नोव्हेंबरला निवडणूक आहे, अशातच रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक पार्टींमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे. पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन; पश्चिमेला नेवाडा आणि ऍरिझोना आणि दक्षिण - जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत कोणत्याही क्षणी मतदान पालटू शकते अशी परिस्थिती आहे. 

न्यूयॉर्क टाईम्स/सिएना सर्वेक्षणात हॅरिस या सर्व राज्यांत ट्रम्प यांच्यापेक्षा फार कमी मतांनी आघाडीवर आहेत. परंतू ऍरिझोनामध्ये ट्रम्प मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत. विजयाच्या दृष्टीने कोणताही स्पष्ट पर्याय सध्या दिसत नसला तरी निवडणुकीच्या दिवशी काही चमत्कार झाला तरच मोठ्या फरकाने विजयी होता येणार आहे. 

या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत आहे. ट्रम्प जिंकले तर अमेरिकेच्या धोरणांमध्ये बदल होऊ शकतो. रशिया-युक्रेन युद्धाबाबतही ट्रम्प यांची मानसिकता वेगळी आहे. उद्या सुमारे सुमारे २६ कोटी मतदार अध्यक्ष, काँग्रेसचे ५ सदस्य आणि इतर पदांसाठी मतदान करणार आहेत. पुढील 3 दिवसात संभाव्य निकाल येण्याची शक्यता आहे. याचबरोबर आधीच्या ६.६ कोटी मतांचीही मोजणी केली जाणार आहे. तर 25 नोव्हेंबर- हा दिवस पोस्टल मतदानाचा शेवटचा दिवस आहे. 

उद्या मतदान तरी राष्ट्राध्यक्ष निवड अडीज महिने दूर...
11 डिसेंबरला 50 राज्यांचे राज्यपाल राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांना अंतिम मंजुरी देणार आहेत. 17 डिसेंबर- या दिवशी 538 इलेक्टोरल कॉलेज मते वॉशिंग्टनमध्ये पोहोच केली जाणार आहेत. ६ जानेवारी- या दिवशी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. 20 जानेवारी- या दिवशी अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळणार आहे. 

Web Title: Kamla Harris vs Donald Trump: Conflict in seven states, Trump leading in one; The world's eyes were on the US vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.