केवळ भारतचं नव्हे तर या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:47 PM2018-08-15T12:47:51+5:302018-08-15T12:53:25+5:30
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आजच्याच दिवशी फक्त भारतच नाही तर, जगातील आणखी तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं.
भारताव्यतिरिक्त ज्या तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, बहरिन आणि कांगो या देशांचा समावेश आहे.
खरं तर आपल्या देशाला ब्रिटीश 1947 रोजी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1948 रोजी स्वतंत्र करणार होते. पण महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटिशांनी एक वर्षाआगोदर 15 ऑगस्ट 1947रोजीच स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला.
जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1910 ते 1945 पर्यंत कोरिया जापानच्या गुलामगिरीत होता. आज आपण ज्या देशांना दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून ओळखतो, ते आधी एकत्र होते. त्यानंतर 1948मध्ये त्यांना दोन देशांमध्ये वेगळं करण्यात आलं.
15 ऑगस्ट 1971पर्यंत मुळचा अरबांचा देश असलेला बहरिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. सध्याची बहरिनची राजधानी मनामा आहे.
15 ऑगस्ट 1960रोजी कांगो फ्रांसपासून वेगळा झाला. कांगो जवळपास 80 वर्षांपर्यंत फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.