काँगोत ६० दहशतवाद्यांनी केला १२७ महिलांवर बलात्कार
By admin | Published: May 15, 2015 10:06 AM2015-05-15T10:06:29+5:302015-05-15T10:10:43+5:30
मध्य आफ्रिकेतील काँगो या देशातील एका गावावरील हल्ल्यादरम्यान ६० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल १२७ महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
किंशासा, दि. १५ - मध्य आफ्रिकेतील काँगो या देशातील एका गावावरील हल्ल्यादरम्यान ६० सशस्त्र दहशतवाद्यांनी तब्बल १२७ महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हिंसाचारग्रस्त काँगोत मदतकार्य करणा-या सामाजिक संस्थेने हा दावा केला असून या महिला १४ ते ७० या वयोगटातील आहेत.
काँगो या देशात विविध दहशतवादी संघटना व सैन्य यांच्यात संघर्ष सुरु असून काही दिवसांपूर्वी ६० दहशतवाद्यांनी शाबुंदा येथील किकांबा येथे हल्ला केला होता. हल्ल्यात दहशतवाद्यांनी गावात लुटमार तर केलीच पण तिथून पळ काढण्यापूर्वी गावातील १२७ महिलांनी अमानूष लैंगिक अत्याचार केले. याशिवाय गावातील लहान मुलांना बेदम मारहाण करुन लुबाडलेला माल ट्रकमध्ये ठेवण्यास भाग पाडण्यात आले. दहशतवादी पळून गेल्यावर पिडीत महिला उपचारसाठी दाखल झाल्या. आम्ही तब्बल १२७ महिलांवर उपचार केले अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील समाजसेवी संस्था मेडिसीस सेन्स फ्रंटियर्यच्या सदस्याने दिली. काँगोत सैन्याचे जवान व दहशतवाद्यांनी ग्रामीण भागातील महिलांवर बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडल्या असून संयुक्त राष्ट्राने वारंवार या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.